आंबेओहळ धरणग्रस्तांचे उत्तूरला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:23+5:302021-03-04T04:44:23+5:30
यावेळी धरणग्रस्तांनी संकलन दुरुस्तीमधील त्रुटी अपूर्ण आहेत, अनेक विस्थापितांना जमिनी देय आहेत, जमिनींचे पेंमट वाटप झालेले नाही, खडकाळ जमिनीचे ...
यावेळी धरणग्रस्तांनी संकलन दुरुस्तीमधील त्रुटी अपूर्ण आहेत, अनेक विस्थापितांना जमिनी देय आहेत, जमिनींचे पेंमट वाटप झालेले नाही, खडकाळ जमिनीचे सपाटीकरण झालेले नाही,
लिंगनूर, कडगाव येथील भूखंड वाटप झालेले नाही, प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्याबाबत दिंरगाई, शासकीय नोकरीत समावेश नाही, न्यायालयाच्या निकालानुसार कारवाई नाही, करपेवाडीच्या जगद्गुरू मठाच्या जमिनीचा प्रलंबित प्रश्न, असे अनेक प्रश्न असताना घळभरणी का सुरू केली, असा प्रश्न धरणग्रस्तांनी उपस्थित केला.
आंदोलनात शिवाजी गुरव, सदानंद व्हनबट्टे, मधुकर पोटे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.
-------------------
* घळभरणीच्या स्थगितीसाठी प्रयत्न
शासनाने कायद्याला बगल देऊन घळभरणी केली आहे. कायद्याचा आधार घेऊन धरणग्रस्त न्यायालयात दाद मागून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत. तसे प्रयत्न धरणग्रस्तांनी सुरू केले आहेत.
--------------------
* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे आंदोलनासाठी उपस्थित आंबेओहळ धरणग्रस्त.
क्रमांक : ०२०३२०२१-गड-०७