आंबेओहोळ धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:13 PM2020-12-02T17:13:22+5:302020-12-02T17:16:28+5:30
dam, morcha, kolhapurnews आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बेमुदत आत्मक्लेश आंदोलन पाटबंधारे खात्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी मागे घेण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर शुक्रवार (२७) पासून सुरू होते.
गडहिंग्लज : आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बेमुदत आत्मक्लेश आंदोलन पाटबंधारे खात्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी मागे घेण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर शुक्रवार (२७) पासून सुरू होते.
जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कार्याध्यक्ष उदय कदम यांनी धरणग्रस्तांची भेट घेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, पुढील आठवड्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणग्रस्तांची बैठक लावत असल्याचे लेखी आश्वासन शाखाअभियंता रामहरी हारदे यांच्याकडून मिळालेनंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ताबा न मिळालेल्या जमीन वाटपाचे आदेश रद्द करा, ज्यांना जमीन हवी त्यांना पर्यायी जमीन द्यावी, त्यांच्यावर पॅकेज घेण्याची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, सदाशिव शिवणे, नामदेव पोटे, शंकर पावले, रावसाहेब पोवार, सखाराम कदम, आनंदा बाबर, महादेव खाडे, सचिन पावले, आनंदा पावले आदी सहभागी झाले होते.
गडहिंग्लज प्रांतकचेरीसमोर सुरू असलेल्या आंबेओहोळ धरणग्रस्तांशी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी चर्चा केली. यावेळी कॉ. शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, बाळेश नाईक आदी उपस्थित होते.