आंबेओहोळमुळे आजऱ्यातील हिरव्या पट्यात वाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:52+5:302021-07-21T04:17:52+5:30

सदाशिव मोरे आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं ...

Ambeohol will increase the green belt of the disease | आंबेओहोळमुळे आजऱ्यातील हिरव्या पट्यात वाढ होणार

आंबेओहोळमुळे आजऱ्यातील हिरव्या पट्यात वाढ होणार

Next

सदाशिव मोरे

आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं सोनं पिकण्यास सुरवात झाली आहे. आता आंबेओहोळ प्रकल्पामुळे उत्तूर परिसरातील अनेक गावे हिरव्या पट्यात येत आहेत. तालुक्यातील सर्फनाला, उचंगी हे प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत आजरा तालुक्यातील काळ्या मातीला मुबलक पाणी मिळून सुजलाम-सुफलाम होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या शेतीला आज चित्री, एरंडोळ, धनगरवाडी व खानापूर या धरणांमुळे पाणी मिळण्यास मदत झाली आहे. चित्रीचे पाणी अनेक शेतकऱ्यांनी हिरण्यकेशी नदीतून उचलून आपल्या शेतीला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी पट्यातील जमीन हिरवीगार झाली आहे.

अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही हिरण्यकेशी नदीवर असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पायपीट थांबली आहे. डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्याची वाटचाल प्रकल्पातील पाण्यामुळे नियोजनबद्ध विकासाकडे सुरू आहे.

शेतीला पाणी मिळत असल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. अनेक शेतकरी भाजीपाल्यासह उन्हाळी व कडधान्याची पिकेही घेत आहेत. धरणातील पाण्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. साखर कारखान्याच्या स्थापनेपासून उसाच्या बाबतीत परावलंबी असणारा आजरा कारखाना सध्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.

चालू वर्षी जवळपास ३ लाख टनपेक्षाही जास्त उसाचे उत्पादन होणार आहे. सर्फनाला व उचंगीच्या धरणांच्या पूर्णत्वानंतर जमिनीला मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

आजपर्यंत मागास व डोंगराळ असा असणारा शिक्का पुसून हिरवं सोनं पिकविण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे.

..

चित्रीसह अन्य प्रकल्पामुळे १८९९ हेक्टर क्षेत्राला पाणी

पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार चित्रीचे ९५४ हे., एरंडोळ १३८ हे., धनगरवाडी १३६ हे., उचंगी ८० हे., सर्फनाला ५९१ हे., असे १८९९ हे., जमिनीला पाणी दिले जाते. उचंगी व सर्फनाला प्रकल्प झाल्यानंतर यामध्ये वाढ होणार आहे.

तालुक्यातून ३४ लाखांची पाणीपट्टी वसुली

हिरव्या पट्यातील जमिनीसाठी हे. ११२२ रुपये, पाणीपट्टी व २० टक्के लोकल फंड तर हिरव्या पट्याच्या बाहेरील जमिनीसाठी १६८६ रुपये हेक्टरी पाणीपट्टी आकारली जाते. तालुक्यात चालू वर्षी पाटबंधारे विभागाने ३४ लाखांची पाणीपट्टी वसूल केली आहे.

Web Title: Ambeohol will increase the green belt of the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.