आंबेओहोळप्रश्नी भाजपचे श्रेयवादाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:13+5:302020-12-11T04:52:13+5:30
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुटले आहेत. भाजप सरकारने ...
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुटले आहेत. भाजप सरकारने पाच वर्षांत आंबेओहळ धरणग्रस्तांचे किती प्रश्न सोडविले यांचे आत्मचिंतन करावे, मगच श्रेयवादाचे राजकारण करावे, असे उत्तूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाखेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून म्हटले आहे. भाजपच्या काळात आंबेओहोळ प्रकल्पासाठी आलेला पुनर्वसनाचा निधी विदर्भाकडे वळविण्यात आला. त्यामुळे पुनर्वसनास विलंब झाला. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून विस्थापितांचे प्रश्न सुटले. भाजपकडे महत्त्वाचे खाते असताना पुनर्वसनासाठी विलंब का झाला. मुश्रीफ यांच्यामुळेच प्रकल्प मार्गस्थ लागत आहे. भाजपच्या मंडळींनी पेपरबाजी करून श्रेयवाद घेऊ नये.
प्रसिद्धिपत्रकावर वसंत धुरे, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, शिरीष देसाई, गणपती सांगले, विजय गुरव आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.