राज्यात द्वेशाचे वातावरण : कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:04 AM2018-04-28T00:04:22+5:302018-04-28T00:04:22+5:30
पेठवडगाव : शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात लेखणी घेऊन क्रांती केली. मात्र, कधी नव्हते तेवढे द्वेशाचे वातावरण महाराष्ट्रात झाले आहे. छत्रपतींचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
येथील पालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘शिवराय ते भीमराय’ विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी कोकाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय पाटील होते. यावेळी नगरसेवक संदीप पाटील, राजाराम यादव, बाबा महाडिक, हिंदुराव
हुजरे-पाटील, संभाजी पवार,
वसंतराव चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते.
कोकाटे पुढे म्हणाले, काही पक्षपाती लोकांनी खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. बहुजनांची युवापिढी बरबाद झाली पाहिजे म्हणून त्यांच्या हातात दगड दिले जातात. दंगली, भांडणे होऊ नये याची सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.
यावेळी नगरसेवक कालिदास धनवडे, हनमंत पाटील, बंडखोर
सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे, अमोल परीट, अभिजित यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.