कणेरी अलगीकरण कक्षास रुग्णवाहिका, वैद्यकीय साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:52+5:302021-06-04T04:18:52+5:30
या अलगीकरण केंद्रास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराजदादा पाटील फाउंडेशन, सतेज पाटील विकास ...
या अलगीकरण केंद्रास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराजदादा पाटील फाउंडेशन, सतेज पाटील विकास मंच कणेरी यांच्यावतीने अत्यावश्यक सेवेसाठी अॅम्ब्युलन्स, वाफेची मशीन, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क, पाणी गरम करण्यासाठी हीटर, इतर आवश्यक साहित्य गोकुळचे नूतन संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले. या वेळी एम. बी. पाटील, माजी ग्रा. प. सदस्य विजय पाटील, अमन शिंदे, अतुल पाटील, विलास पाटील, चंद्रकांत शिंदे, पोलीस पाटील संग्राम पाटील, ग्रा. प. सदस्य तात्यासाहेब माळी, उदय चोरडे आदींसह दत्ता चिखलव्हाळे, तुषार देसाई, मिथुन पाटील, त्रिशूल पाटील, रोहन माळी, प्रदीप कदम, संजय कदम, भारत चोरडे आदींसह ग्रामदक्षता कमिटीचे सदस्य, सुशोम फाउंडेशनचे सदस्य, समर्थ तालीम मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
कणेरी येथील अलगीकरण केंद्रास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराजदादा पाटील फाउंडेशन, नामदार सतेज पाटीलसाहेब विकास मंच कणेरी यांच्यावतीने अत्यावश्यक सेवेसाठी अॅम्ब्युलन्स, वाफेची मशीन, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क, पाणी गरम करण्यासाठी हीटर, इतर आवश्यक साहित्य गोकुळचे नूतन संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले.