साताºयातील युवा चित्रकार अमित ढाणेची मुंबईत झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:11 AM2017-08-27T01:11:15+5:302017-08-27T01:13:44+5:30
साताºयातील चित्रकार अमित चंद्रकांत ढाणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या मंगळवारी मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. ‘इंडिया डायरीज्’ या प्रदर्शनातून त्यांनी भारतातील विविध राज्यांत भटकंती करून चित्र विषय निवडले आहेत.
साताºयातील चित्रकार अमित चंद्रकांत ढाणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या मंगळवारी मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. ‘इंडिया डायरीज्’ या प्रदर्शनातून त्यांनी भारतातील विविध राज्यांत भटकंती करून चित्र विषय निवडले आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने अमित यांचे कलाशिक्षक असलेले वडील चंद्रकांत ढाणे यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.
आम्ही साताºयाजवळील ढाण्यांच्या पाडळीचे. अमित लहानाचा मोठा येथेच झाला. सुरुवातीला शानभाग विद्यालयात घातला; पण तेथे त्याचं काही जमलं नाही. नंतर हत्तीखान्यात तेव्हाच्या मुख्याध्यापिका थोरात बार्इंच्या ताब्यात दिलं. चौथीनंतर माझ्या नजरेसमोर राहील म्हणून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मी सातारा कन्याशाळेतच होतो. काही दिवसांनंतर या बालकलाकाराच्या तक्रारी येऊ लागल्या.
बघावी तेव्हा हातात क्रिकेटची बॅट अन् मुक्काम कोटेश्वर मैदान. त्यावेळचे त्याचे सवंगडीपण भारीच. तेव्हा आम्ही ऐक्य कॉर्नरला रहायचो. अक्षय काळे त्याच्या खास मित्रांपैकी एक. शाळा सुटल्यावर अन् सुटीच्या दिवशी यांच्या खोड्यांना पार बहर येत असे. एकदा शरद पुराणिक सर शाळा सुटल्यानंतर करंजे येथील घरी चालले होते. त्यावेळी या दोघा मित्रांनी प्लास्टिकच्या सापाला दोरा बांधून रस्त्यावर टाकला होता. सर जवळ आल्यावर लपून बसलेल्या या मित्रांनी हळूहळू दोरा ओढला, तर तो साप चालू लागला. त्यावेळी सरांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
असे आमचे सुपुत्र. पुढे दहावीत तो खूप कष्ट घेऊन उत्तीर्ण झाला.
आमच्या घरी कलेचं वातावरण. ते अमितच्या नकळत डोक्यात घुसंलच होतं. माझे रंग, ब्रश, ड्रॉर्इंग पेपर्स सारं काही त्याच्याच बापाचं होतं. त्याचा तो मुक्तपणे वापर करीत असे. त्याची कलेची आवड व दहावीला मिळालेले गुण यांचा विचार करता त्याची आई सुरेखा अन् मी निर्णय घेऊन टाकला तो म्हणजे अमितला कलेचच उच्च शिक्षण द्यायचं.
पाठखळ माथ्यावरील कला महाविद्यालयात प्रा. विजय धुमाळ यांच्याकडे फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी सोपवलं. मात्र, वेगळ्याच विश्वात रमणारी त्याची मित्रमंडळी सारखीच घरी यायला लागली. कसंबसं फाउंडेशन पार पडलं अन् लगेचच पुण्याला ‘अभिनव’मध्ये घालण्याचा निर्णय घेतला. तेथील प्रवेशाचे काम प्रा. सुधाकर चव्हाण, प्रा. विजय कदम, प्रा. रामकृष्ण कांबळे यांच्यामुळं सोपं झालं. आणि येथूनच अमितचा खरा कलाप्रवास सुरू झाला.
शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात शिकणाºयाला हवं ते मिळत असतं. याची प्रचिती अमितच्या बाबतीत येऊ लागली. शैक्षणिक अभ्यासाबरोबरच राज्यात विविध ठिकाणी ‘आॅन द स्पॉट’ चित्र स्पर्धा होतात. अमितनंही यात झोकून दिलं.
प्रारंभी यश काही मिळत नव्हतं; पण तो खचला नाही. जिद्दी स्वभावाचा मुलगा तो. कठोर परिश्रमाची तयारी असल्याने त्यानं आपल्या कामात विलक्षण बदल घडवून आणले. ध्येयवेड्या या कलावंताला अनेक शिखरं खुणवू लागली. आणि सुरू झालं यश प्राप्त करण्याचं अभियान.
सतत पहिल्या तीनमध्ये यायचंच याची त्याला सवय लागली. बघता बघता पारितोषिकांनी घर भरू लागलं. हे सारं करत असताना १ तारीख जवळ आली की, फक्त आईशीच संपर्क साधत असे. आता नामवंत प्राध्यापक, चित्रकार व गुणी मित्रमंडळींशी त्याची जवळीक वाढत होती.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सवय, वरिष्ठांचा आदर करणं असा त्याचा स्वभाव. सर्वांनाच सुसंस्काराची साक्ष देत होता. प्रथम फाईन आर्ट नंतर कमर्शिअल आर्ट, पुढे ब्रीच कोर्स. अजूनही काहीतरी शिकलं पाहिजे, याची लागलेली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचबरोबर कलाविषयक कामही करणं सुरूच झालं होतं. तो लहानपणी होता कसा आणि आता बदललेला अमित. हत्तीखाना शाळेपासून जगप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीपर्यंत पोहोचला यासाठीचा माझा शब्दप्रवास उंच भरारी घेणाºया सर्वच मुलांसाठी.
राष्टÑीय, आंतरराष्टÑीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत, प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव, प्रफुल्ल सावंत, रावसाहेब गुरव, प्रमोद कांबळे, प्रमोद कुर्लेकर, सत्यजित वरेकर, संजय कुंभार, सागर गायकवाड अशा अनेकांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन ही अमितच्या वाटचालीतील बलस्थानचं आहेत. आता मागे वळून पाहिलं असं वाटत नाही. २०१६ पर्यंत त्याने राज्य व राष्टÑीय स्तरावरील १०१ पारितोषिके प्राप्त केली. आता तो १ तारखेला आई असो की मी आम्हाला काहीच त्रास देत नाही. पारितोषिकांच्या रकमेतून त्याने बुलेटपण घेतली आहे. त्यामुळे प्रवासापेक्षा कामातील गती वाढल्याचं दिसून येतंय. अनेक मान, सन्मान मिळूनही हुरळून न जाता कलाकाराच्या अंगी असणारी परिपक्वता त्याच्या ठायी स्पष्ट दिसून येते .
२९ आॅगस्ट २०१७ अमितच्या आयुष्यातील ‘सुवर्णक्षण’ जो मला साधता आला नाही. पण मुलानं हे यश मिळवलं यासारखा विलक्षण आनंद दुसरा कोणताही नाही. २९ आॅगस्टला मुंबईच्या जगप्रसिद्ध जहांगिर आर्ट गॅलरीत अमितच्या विविध माध्यमात व विविध ठिकाणी काढलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन होत आहे.
अमितनं या प्रदर्शनास ‘इंडिया डायरीज्’ असे नाव दिलंय. त्यामागेही त्याच्या कल्पना बोलक्या आहेत. त्याने विविध राज्यांत भटकंती करून चित्र विषय निवडले आहेत. भारत देश किती सुंदर आणि विविधतेने नटलेला आहे याच मनोहारी दर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून कला रसिकांना होणार आहे. प्रत्येक चित्र सजीव अन् बोलक वाटेल हे नक्की. खरं तर प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतींचं मूल्यमापन आपणासारख्या सहृदयी कलाप्रेमींनीच करायला हवं.