Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट
By समीर देशपांडे | Published: February 19, 2023 07:18 PM2023-02-19T19:18:41+5:302023-02-19T19:19:19+5:30
२००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या ४८ जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या निवडून द्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी केले.
भाजपच्या विजय संकल्प यात्रा सभेमध्ये ते बोलत होते. २००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत अधिकाधिक खासदार निवडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपबरोबर युती करून शिवसेना सडली असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस राष्ट्रवादीने अडीच वर्षातच संपून रस्त्यावर आणले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, सुरेश हळवणकर यांची भाषणे झाली.