आमजाई व्हरवडे-शिरगाव रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:04+5:302021-08-23T04:27:04+5:30
आमजाई व्हरवडे-शिरगाव हा दोन किलोमीटर अंतर असणारा मुख्य रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या रस्त्याची ...
आमजाई व्हरवडे-शिरगाव हा दोन किलोमीटर अंतर असणारा मुख्य रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लहान खड्ड्याचे साम्राज्य असणाऱ्या या रस्त्यावर आता दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने हे दोन किलोमीटर अंतर पार करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते .
आता पावसाची उघडझाप सुरू असल्यामुळे या रस्त्यावर चिखलही झाला आहे. त्यामुळे या खड्ड्यात पडून पंधरा दिवसांपासून दहा-बारा मोटारसायकस्वार जखमी झाले आहेत.
एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
चौकट
लोकप्रतिनिधींचीही या मार्गावरून ये जा!
या मार्गावरून लोकप्रतिनिधीही ये-जा करीत असतात. मग या लोकप्रतिनिधींना दोन-दोन फुटांचे पडलेले खड्डे दिसत नाहीत का? की एखादा मोठा अपघात झाल्यावर सांत्वनासाठी त्यांच्या घरी हे लोकप्रतिनिधी जाणार, असा संतप्त सवाल वाहनधारकांतून विचारला जात आहे.