वाढदिवसाला जमलेली रक्कम वाचनालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:41+5:302021-04-24T04:23:41+5:30

चंदगड : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शेतकरी कृष्णा कामाना पाटील यांनी आपल्या ९० व्या वाढदिवसानिमित्त जमा झालेली ३२११ रक्कम ...

The amount collected for the birthday is a gift to the library | वाढदिवसाला जमलेली रक्कम वाचनालयाला भेट

वाढदिवसाला जमलेली रक्कम वाचनालयाला भेट

Next

चंदगड : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शेतकरी कृष्णा कामाना पाटील यांनी आपल्या ९० व्या वाढदिवसानिमित्त जमा झालेली ३२११ रक्कम गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास देणगी स्वरूपात दिली. अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या .

माजी सरपंंच सुुुरेश नाईक यांनी साहित्यिक रणजित देसाई लिखित नाटक, कादंबरी, कथासंग्रह आदी ४२ पुस्तकांचा संच वाचनालयास प्रदान केला.

शिवप्रतिमेचे पूजन उपसरपंच संभाजी पाटील यांच्याहस्ते झाले. कृष्णा पाटील व सुरेश नाईक यांच्यासह वर्षभर विविध वर्तमानपत्रे देणगी स्वरूपात देणारे प्रताप आनंदराव पाटील, फारूख कालकुंद्रीकर (कुदनूर), संदीप बाजीराव पाटील, तुळशीदास जोशी यांचा सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल, तर धावपटू पांडुरंग पाटील व सुमित पाटील यांचा राज्य पातळीवरील यशाबद्दल सत्कार झाला.

यावेळी हरिचंद्र पाटील, झेवियर क्रुझ, शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील, वंदना पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. कडोलकर यांनी सूत्रसंचालन केले. विलास शेटजी यांनी आभार मानले.

वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: The amount collected for the birthday is a gift to the library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.