अमरावती उपउपांत्य फेरीत

By admin | Published: December 13, 2014 12:09 AM2014-12-13T00:09:51+5:302014-12-13T00:14:51+5:30

राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा : बाद फेरीला प्रारंभ

In the Amravati U-Up | अमरावती उपउपांत्य फेरीत

अमरावती उपउपांत्य फेरीत

Next

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित ४६व्या राज्य अजिंक्यपद व्हॉलिबाल स्पर्धेत बाद फेरीत मुलीच्या सामन्यात अमरावती विरुद्ध सोलापूर यांच्यात अटीतटीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये सोलापूरने आघाडी घेतली, मात्र नंतरच्या दोन सेटवर अमरावतीने २१-२५, २५-१६, १६-१२ अशा सेटने सामना जिंकत उपउपांत्य फेरीतत प्रवेश केला. सोलापूरच्या उमा माने व प्रांजली पवार यांची खेळी संघाला तारू शकली नाही.
ठाणे विरुद्ध औरंगाबाद पुरुषांच्या सामन्यात औरंगाबाद संघ विजयी झाला, तर यवतमाळ विरुद्ध बीड यांच्या सामन्यात यवतमाळ संघाने २-१ ने विजयी झाला.
दरम्यान, सायंकाळी सात वाजता साखळी सामने संपले. यामध्ये मुंबई सब विरुद्ध कोल्हापूर, ठाणे विरुद्ध जालना, पुणे विरुद्ध मुंबई सिटी, लातूर विरुद्ध गोंदिया, सांगली विरुद्ध यवतमाळ, रायगड विरुद्ध जळगाव, मुंबई विरुद्ध अकोला यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली.
आज, शुक्रवारी दिवसभर झालेल्या साखळी सामन्यातील निकाल पुढीलप्रमाणे -
पुरुष संघ :
लातूर विरुद्ध गोंदिया - लातूर विजयी - १९-२५, २५-१७, १५-८, सिंदुधुर्ग विरुद्ध बुलढाणा - सिंधुदुर्ग विजयी - २५-१६, २५-२३, चंद्रपूर विरुद्ध नंदूरबार - चंद्रपूर विजयी - २५-१९, २५-१७, मुंबई सिटी विरुद्ध बुलढाणा - मुंबई विजयी - २५-१०, २५-१९, नांदेड विरुद्ध पालघर - पालघर विजयी - २६-२४, १३-२५, १६-१४, उस्मानाबाद विरुद्ध अहमदनगर - उस्मानाबाद विजयी - २५-१५, २५-०६, पुणे विरुद्ध ठाणे - पुणे विजयी - २५-२०, २५-१७, नागपूर विरुद्ध सांगली - नागपूर विजयी, नागपूर विरुद्ध अकोला - नागपूर विजयी - २५-१५, २५-२०, मुंबई सिटी विरुद्ध जालना - जालना विजयी - २५-१३, २५-१८, लातूर विरुद्ध हिंगोली - हिंगोली विजयी- २५-२५, २५-२१, १५-१२, सांगली विरुद्ध यवतमाळ - यवतमाळ विजयी - २९-२७, २२-२५, १५-१०, भंडारे विरुद्ध परभणी - परभणी विजयी - २५-१०, २५-१९, रायगड विरुद्ध जळगाव - रायगड विजयी - २५-१२, २५-१८.
महिला संघ : नाशिक विरुद्ध कोल्हापूर - नाशिक विजयी- २५-२१, २६-२४, अकोला विरुद्ध अमरावती - अकोला विजयी - २५-०८, २५-१८, पुणे विरुद्ध यवतमाळ - पुणे विजयी - २५-१७, २५-१०, लातूर विरुद्ध सिंधुदुर्ग - लातूर विजयी - २५-०९, २५-११, मुंबई सिटी विरुद्ध जालना - मुंबई सिटी विजयी - २५-०८, २५-०६, नांदेड विरुद्ध पालघर - पालघर विजयी - २५-०३, २५-०७. (वार्ताहर)

उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी सामने रंगात आले असतानाच रात्री ८.३० च्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार पावसाने मैदान पाण्याने भरून गेले. त्यामुळे विद्युत प्रकाशझोतातील रात्रीचे पुढील सामने रद्द झाल्याची घोषणा आयोजक समितीने केली. त्यामुळे आज बाद फेरीमध्ये तीनच सामने झाले.

Web Title: In the Amravati U-Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.