अमरीश घाटगे यांना पोलीसांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 03:10 PM2019-05-23T15:10:19+5:302019-05-23T17:28:29+5:30

रमनमळा मतमोजणी केंद्राबाहेर जाण्यासाठी आदेश धुडकावून हुज्जत घालणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण-अर्थ समिती सभापती व गोकुळचे संचालक अमरीश संजय घाटगे (वय ३०) यांना बंदोबस्ताला असणाºया पोलीसांनी मारहाण केली.

Amrit Ghatge beaten to death by police | अमरीश घाटगे यांना पोलीसांकडून मारहाण

अमरीश घाटगे यांना पोलीसांकडून मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देबाहेर जाण्यास मज्जाव केल्याने प्रकार, रमनमळा मतमोजणी प्रवेशद्वारावरील घटनाघाटगे कुटुंबियांनी झालेल्या प्रकाराबाबत आमची कोणाबद्दल तक्रार नसल्याचे सीपीआर पोलीस चौकीत सांगितले

कोल्हापूर : रमनमळा मतमोजणी केंद्राबाहेर जाण्यासाठी आदेश धुडकावून हुज्जत घालणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण-अर्थ समिती सभापती व गोकुळचे संचालक अमरीश संजय घाटगे (वय ३०) यांना बंदोबस्ताला असणाºया पोलीसांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावर पाडून पायावर तळव्यावर काठीने मारहाण केल्याने दोन्ही पायांना गंभीर दूखापत झाली. हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या घरातील कुटुंबियांना या प्रकाराची माहिती समजताच माजी आमदार संजय घाटगे, त्यांची पत्नी अरुंधती, अमरिश यांच्या पत्नी सुयशा यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. गुरुवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने यांनी सीपीआरमध्ये येवून अमरिश यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, डॉ. विजय बरगे, डॉ. सचिन शिंदे यांनी तत्काळ त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया केली. घाटगे कुटुंबियांनी झालेल्या प्रकाराबाबत आमची कोणाबद्दल तक्रार नसल्याचे सीपीआर पोलीस चौकीत सांगितले. त्यानंतर याप्रकरणावर पडदा पडला.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमनमळा येथे गुरुवारी सकाळी आठ पासून सुरु होती. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी म्हणून अमरिश घाटगे मतमोजणी केंद्रामध्ये सकाळी नऊ वाजता गेले होते. त्यांचे घर मतमोजनी केंद्रापासून हाकेच्या अंतरावरील स्माईल स्टोन बिल्डिंग येथे आहे. दूपारी बारापर्यंत ते दोन-तीन वेळा मतमोजणी केंद्रातुन घरी कामानिमित्त गेले. साडेबाराच्या सुमारास ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. प्रवेशद्वारासमोर सशस्त्र पोलीस बंदोबस्त होता. महिला अधिकाºयाने त्यांना अडवून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही असे सांगितले. त्यावर घाटगे यांनी मी घराकडे निघालो आहे, मला सोडा असे सांगताच महिला अधिकाºयाने तुम्ही सारखे घरी जाता, एकदा आत आलेनंतर पुन्हा बाहेर जाता येत नाही, तसे सोडायचे आदेशही आम्हाला नाहीत. त्यामुळे तुम्हाला बाहेर जाता येणार नाही असे सांगितले.

घाटगे यांनी मी एकटा आहे, दोनशे कार्यकर्ते आलेनंतर काय करणारा असे म्हणून ते पोलीसांना बाजूला ढकलून पुढे निघाले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. बंदोबस्ताला असणाºया पंधरापेक्षा जास्त पोलीसांनी घाटगे यांना रस्त्यावर पाडून पायाची नडगी आणि तळवे काठीने ठोकुन काढले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून हाकेच्या अंतरावरील घराच्या गॅलरीत उभे असलेले माजी आमदार संजय घाटगे यांनी मारु नका, काय झाले असे म्हणत ते खाली धावत घराबाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी अरुंधती, सून सुयशा आल्या. त्यांनी पोलीसांच्या तावडीतून अमरिश यांना सोडवून घेत कारमधून सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दूखापत झाली होती. तळव्याची सालटे निघाली होती. येथील डॉक्टरांनी त्यांचेवर तत्काळ शस्त्रक्रिया केली. या प्रकाराची माहिती समजताच आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सीपीआरमध्ये भेट देवून घाटगेच्या प्रकृत्तीची विचारपूस केली.

घाटगे यांच्या पायाला सूज आली आहे. त्यांना चालता येणार नसल्याने येथील डॉक्टरांनी अ‍ॅडमिट करावे लागेल असे घाटगे कुटुंबियांना सांगितले. त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सीपीआर पोलीस चौकीत वर्दी दिली. येथील ठाणे अंमलदारांनी जबाब घेतला असता आमची कोणाबद्दल तक्रार नसल्याचे अमरिश घाटगे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना घरी नेले.
काय बोलायचे

मुलग्याला मारहाण झालेचा मानसिक धक्का माजी आमदार संजय घाटगे यांना बसला होता. त्यांच्या चेहºयावर ते स्पष्ट जाणवत होते. त्यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी एसपी साहेब बोलणार आहेत, म्हणून मोबाइल देण्यासाठी जवळ गेले. त्यावर घाटगे यांनी काय बोलायचे, झाल ते झालं असे म्हणून टाळले. मात्र, काकडे यांनी आग्रह केल्याने त्यांनी फोन घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचेशी ते दोनचं मिनीटे बोलले.

Web Title: Amrit Ghatge beaten to death by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.