८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:38 PM2022-12-03T13:38:03+5:302022-12-03T13:52:56+5:30

'हम भी कुछ कम नही' असे ठसकावून सांगत, मी निवडून येण्यासाठीच अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

An 80-year-old grandmother from Kaneri in Kolhapur district filed her candidature for the Gram Panchayat elections | ८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

googlenewsNext

कणेरी : कणेरी ता.करवीर येथील ८० वर्षाच्या इंदुबाई रघुनाथ लोंढे यांनी 'हम भी कुछ कम नही' असे ठसकावून सांगत ग्रामपंचायत सदस्य पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः दाखल करत होय मी निवडून येण्यासाठीच अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये दाखल झालेल्या उमेदवार पहिले तरुणांचा भरणा अधिक आहे. मात्र शुक्रवारी दुपारी कनेरी येथील इंदुबाई लोंढे या ८० वर्षाच्या आजीने प्रभाग तीन मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा  होता.

माध्यमांनी उमेदवारी बाबत विचारले असता निवडणूक लढवण्याची फार वर्षापासून इच्छा होती काही कारणाने ती अपुरी राहिली होती. मात्र, यंदा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. उभी राहणार व निवडून येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Web Title: An 80-year-old grandmother from Kaneri in Kolhapur district filed her candidature for the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.