तोल जाऊन पडल्याने शिकाऊ वीज कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:46 PM2022-07-22T23:46:40+5:302022-07-22T23:47:51+5:30
घटनास्थळावरून मिळालेली माहिती करवीर तालुक्यातील केर्ले येथील सबस्टेशमध्ये प्रथमेश सुतार शिकाऊ वायरमन म्हणून सहा महिन्यापूर्वी कामावर लागला होता.
- सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : करवीर तालुक्यातील पडवळवाडी येथे शेतीला वीज पुरवठा करणाऱ्या वीजेच्या तारेच्या दुरूस्तीचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या शिकाऊ कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. प्रथमेश विजय सुतार (वय रा.आसुर्ले ता.पन्हाळा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. संबधित घटनेची सीपीआर चौकीत नोंद झाली आहे.
शिकाऊ असणाऱ्या प्रथमेशला वीजेच्या खांबावर का चढवले. अनुभवा अभावी त्याचा मृत्यू झाला. याला महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांना सीपीआरमध्ये बोलवून घ्या. त्यांच्या गलथानपणामुळेचं त्याचा मृत्यू झाल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आसुर्ले ग्रामस्थ आणि नातेवाईकांना सीपीआर आवारात तासभर गोंधळ घातला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती करवीर तालुक्यातील केर्ले येथील सबस्टेशमध्ये प्रथमेश सुतार शिकाऊ वायरमन म्हणून सहा महिन्यापूर्वी कामावर लागला होता. आज शुक्रवारी पडवळवाडी येथील शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या ११ हजार व्होलटेजच्या तारेतील तांत्रिक दोष तपासण्यासाठी प्रथमेश खांबावर चढला होता. काम करत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडला.त्याला बेशुद्ध अवस्थेत सीपाआरमध्ये नेले असता त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.