प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 04:30 PM2022-11-09T16:30:23+5:302022-11-09T16:31:04+5:30

वडील शौचालयात गेले असता दाराच्या खालच्या फटीतून पेट्रोलसारखा ज्वालाग्रही पदार्थ ओतून त्यास आग लावून जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

An attempt to burn the birth father alive due to a property dispute, a shocking incident in Kolhapur | प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Next

सिद्धनेर्ली : व्हन्नूर (ता. कागल) येथे प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यामध्ये देवबा बिरू हजारे (वय ७९) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल शासकीय करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी, मंगळवार (८ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेसहा वाजता देवबा हजारे हे शौचालयात गेले असता दाराच्या खालच्या फटीतून पेट्रोलसारखा ज्वालाग्रही पदार्थ ओतून त्यास आग लावून वडिलांनाच जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी देवबा हजारे हे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना दाराच्या बाहेरील बाजूस उभा असलेला मुलगा शिवाजी देवबा हजारे याने कडी लावली. तू माझ्याविरुद्ध कशी तक्रार करतोस व प्रॉपर्टीची वाटणी देत नाहीस काय? तुला जिवंत जाळतो, असे म्हणू लागला. तसेच त्यांची पत्नी सरला शिवाजी हजारे हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलगा व सून यांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असे देवबा हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: An attempt to burn the birth father alive due to a property dispute, a shocking incident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.