आनंदराव पाटील-चुयेकर यांचा वसा ‘गोकुळ’मध्ये चालविण्यासाठी तत्पर : शशिकांत पाटील-चुयेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:44+5:302021-05-18T04:23:44+5:30

नुकत्याच झालेल्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि मुश्रीफ साहेब यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतून या नेत्यांनी ...

Anandrao Patil-Chuekar ready to run fat in 'Gokul': Shashikant Patil-Chuekar | आनंदराव पाटील-चुयेकर यांचा वसा ‘गोकुळ’मध्ये चालविण्यासाठी तत्पर : शशिकांत पाटील-चुयेकर

आनंदराव पाटील-चुयेकर यांचा वसा ‘गोकुळ’मध्ये चालविण्यासाठी तत्पर : शशिकांत पाटील-चुयेकर

googlenewsNext

नुकत्याच झालेल्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि मुश्रीफ साहेब यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतून या नेत्यांनी गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर यांना संधी दिली आणि खऱ्या अर्थाने या गोकुळच्या विजयात हा मैलाचा दगड ठरला. कै. पाटील यांनी संघउभारणीत आयुष्य घालवले, पण त्यांचा हा वसा आणि वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या मुलाला गोकुळमध्ये घेणे आवश्यक होते. सत्ताधारी गटाकडून फारकत घेतल्यानंतर त्यांना बंटी पाटील साहेब व मुश्रीफ साहेब यांनी आपल्या पॅनलमध्ये घेऊन त्यांचा विजयाचा मार्ग सुकर केला. गोकुळच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शशिकांत पाटील हे सत्ताधारी गटामधून इच्छुक होते, पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी मातोश्री श्रीमती जयश्री पाटील यांना संधी दिली. त्यामुळे स्वत: इच्छुक असणारे पाटील हे सत्ताधारी गटातील नेत्याच्यांवर नाराज होते. या नाराजीतून त्यांनी विरोधी गटाच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. बंटी साहेब, मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने आणि वडील कै. चुयेकर यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत शशिकांत हे भरघोस मताधिक्यांनी निवडून आले. शेतकरी, कष्टकरी, दूध उत्पादकांसाठी अहोरात्र संघर्ष करणारे कै. पाटील यांच्या समाजकार्याचा व राजकारणाचा वसा आणि वारसा घेऊन समाजासमोर आलेले युवा नेतृत्व म्हणजे शशिकांत पाटील-चुयेकर होय. चुयेकरांनी केलेल्या कामाच्या पुण्याईवर आणि स्वकर्तृत्वावर हे युवा नेतृत्व बहरत आहे. या नेतृत्वाने चुये गावचे पाच वर्षे सरपंचपद, बिद्री साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी संघ संचालक, गोकुळ नागरी पतसंस्था विद्यमान चेअरमन, गावातील श्रीराम दूध संस्था, हरहर महादेव पाणीपुरवठा संस्था अशा विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. हा सर्व राजकीय प्रवास चुयेकर यांच्या आशीर्वादाने व कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर सुरू आहे. गोकुळच्या निवडणुकीत ज्यावेळी शशिकांत यांचे तिकीट फायनल झाले त्यावेळीच त्यांच्यावर व चुयेकर साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यातील असंख्य ठरावधारकांनी त्यांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला होता. हा विश्वास त्यांच्या सर्व कुटुंबीयांना व कार्यकर्त्यांना होता. हा विश्वास ठरावधारकांनी मतदानामध्ये परावर्तीत करून सार्थ ठरविला. जिल्हापातळीवर काम करण्याच्या संधीचा फायदा घेऊन नूतन संचालक पाटील यांनी आपल्या कार्याचा आलेख वाढवावा याच आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा !

संकलन : संजीव व्हनाळकर

Web Title: Anandrao Patil-Chuekar ready to run fat in 'Gokul': Shashikant Patil-Chuekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.