र. ग. कर्णिक यांचे कोल्हापुरातील चळवळीला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:39+5:302021-02-07T04:22:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : र. ग. कर्णिक यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कोल्हापुरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी हक्कांसाठी ...

And. C. Karnik's strength in the Kolhapur movement | र. ग. कर्णिक यांचे कोल्हापुरातील चळवळीला बळ

र. ग. कर्णिक यांचे कोल्हापुरातील चळवळीला बळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : र. ग. कर्णिक यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कोल्हापुरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी हक्कांसाठी केेलेल्या चळवळीला पाठबळ दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे खाते अशा विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदाेलन केले त्याचे फलित म्हणून शासनाला निर्णय घेणे भाग पडले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम केलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अनिल लवेकर म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांवर १९७५ साली मोठ्या प्रमाणात दडपशाही केली जात होती. त्यावेळी र. ग. कर्णिक हे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठीच्या संघटनेचे काम करीत होते. पुढे त्यांनी राज्यभर संघटना बांधण्यासाठी दौरे केले. तालुके व गावागावात कार्यकर्ते तयार केले. १९७६-७७ साली कोल्हापूर, सांगली व वारणा येथील काही महाविद्यालयांमधील १५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या संपात र. ग.कर्णिक यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता मिळावा म्हणून १९७८ ला सलग ५४ दिवस बेमुदत संप केला. त्याची दखल घेत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुरू केला.

प्राथमिक शिक्षक समितीचे नेते प्रभाकर आरडे यांनीही त्यांच्या स्मृती जागवल्या. ते म्हणाले, कोल्हापुरात १९९५-९६ दरम्यान पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मात्र १५ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने या कर्मचाऱ्यांसोबत २१ दिवस आंदोलन केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पून्हा कामावर घेण्यात आले. पेन्शन बंद होणार याची कुणकुण लागताच त्यांनी १९९२-९३ साली शाहू स्मारकमध्ये पेन्शन बचाव मेळावा घेतला होता.

---

Web Title: And. C. Karnik's strength in the Kolhapur movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.