..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 03:48 PM2022-11-11T15:48:44+5:302022-11-11T16:36:07+5:30

विशेष म्हणजे, काल गुरुवारी कासारवाडी गावची ग्रामसभा होती

And the angry farmer brought the bull to the village panchayat, incident in Kasarwadi in Kolhapur | ..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

googlenewsNext

शिरोली : शेतात जायला रस्ता नाही, पाठपुरावा करुनही ग्रामपंचायत यावर तोडगा काढत नसल्याने कासारवाडी (ता.हातकणंगले) येथील शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी कासारवाडी ग्रामपंचायतीतच चक्क बैल आणून बांधला.

कासारवाडी गावच्या पश्चिमेला असणाऱ्या क्रशर उद्योगाकडे जाणारा रस्ता वनविभागाने काही दिवसांपूर्वी बंद केला. पर्यायी रस्ता मिळावा याकरिता व्यावसायीकांचा वनविभागाकडे रस्ता मागणीचा प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. याकरीता ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. गायरान मधील उत्खनन व पर्यावरण या प्रकरणी हरित लविदाकडे सुनावणी सुरू असल्याने दाखला देण्यास ग्रामपंचायतीने असमर्थता दर्शवल्याने आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न तात्काळ सोडवावा याकरीता शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी ग्रामपंचायतीतच बैल आणून बांधला.

विशेष म्हणजे, काल गुरुवारी कासारवाडी गावची ग्रामसभा होती. सभा सुरू होण्यापूर्वीच गट नंबर ६३० मधील रस्ता व शेत शिवारात बंद केलेले रस्ते यावरून गोंधळ उडाला. सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब झाल्याचे सरपंच शोभाताई खोत यांनी जाहीर केले.

Web Title: And the angry farmer brought the bull to the village panchayat, incident in Kasarwadi in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.