Kolhapur News: मी चांगला मुलगा, बाप होऊ शकत नाही, डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:26 AM2023-03-13T11:26:32+5:302023-03-13T11:27:11+5:30

कोरोनाच्या काळात केली होती उल्लेखनीय कामगिरी

And the doctor ended his life in the hospital in Murgud Kolhapur | Kolhapur News: मी चांगला मुलगा, बाप होऊ शकत नाही, डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन

Kolhapur News: मी चांगला मुलगा, बाप होऊ शकत नाही, डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन

googlenewsNext

मुरगूड : मुरगूड आणि यमगे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) मूळ गाव नानीबाई चिखली यांनी मुरगूड येथील स्वतःच्या दवाखान्यात आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्याद्वारे मुरगूड पोलिस अधिक तपास करत आहेत.

महेश हे गेले दहा वर्षे यमगे या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुरगूड येथे एसटी स्टॅण्ड परिसरात ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरू केला होता. तिथेही ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. आपल्या कुटुंबासह ते मुरगूडमध्येच राहत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बीएचएमएस शिक्षण घेऊन येथपर्यंत मजल मारली होती. कोरोनाच्या काळात यमगे गावात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते.

आज रंगपंचमी असल्याने मुरगूडमध्ये दुपारी ते आपल्या दवाखान्यात गेले. गर्दी नसल्याने त्यांनी आतील खोलीतील तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. गळफास घेण्याअगोदर त्यांनी आपल्या नातेवाइकांना फोनवरून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले, पण ते घटनास्थळी येईपर्यंत महेशने आत्महत्या केली होती. सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री नानीबाई चिखली येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

कोणास जबाबदार धरू नये

दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मी चांगला मुलगा होऊ शकत नाही, मी चांगला बाप होऊ शकत नाही, मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तसेच मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असा मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: And the doctor ended his life in the hospital in Murgud Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.