Rutuja Latke : शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:54 PM2022-11-06T13:54:37+5:302022-11-06T14:15:12+5:30

Andheri East Bypoll Election Result 2022 : ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांच्या या मोठ्या विजयाने अखेर शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघांच्या आमदार झाल्या आहेत.

Andheri East By Election Result 2022 Rutuja Latke won Shahuwadi's daughter-in-law became Andheri MLA | Rutuja Latke : शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव

Rutuja Latke : शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव

googlenewsNext

 अनिल पाटील

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांच्या या मोठ्या विजयाने अखेर शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघांच्या आमदार झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर तालुक्यातील शिवसैनिकांसह, जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सरुड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, येळवणजुगाई, शेंबवणे आदी परिसरात शिवसैनिकांसह, लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी  फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. श्रीमती ऋतुजा लटके या मुळच्या शाहूवाडी तालुक्यातील शेबंवणे पैकी धुमकवाडी येथील आहेत. 

स्व. रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन पोटनिवडणूकीच्या रिगंणात उतरले होते. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षानीही श्रीमती लटके यांना पाठींबा दिला होता. तर त्यांच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. श्रीमती ऋतुजा लटके यांची उमेदवारी घोषित झाल्यापासूनच शाहूवाडी तालुक्यातील जनतेची या निवडणूकीविषयी असणारी उत्सुकता शिगेस पोहचली होती. अंधेरीतील या पोटनिवडणूकीची तालुक्यात मोठी चर्चा सुरु होती. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी त्यांचे प्रमुख विरोधक भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यासह अन्य सात उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला परंतू अन्य सात उमेदवारांचे अर्ज राहील्याने श्रीमती लटके यांच्या बिनविरोध निवडीला स्पीड ब्रेकर लागला होता. अखेर या निवडणूकीत मोठा विजय प्राप्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बाल्लेकिल्ला शाबूत ठेवला आहे.
      
लटके कुटुंबियाचा राजकीय प्रवास 

स्व. आ. रमेश लटके हे मुंबईत स्थायिक झाल्यापासुनच शिवसेनेच्या माध्यमातून तेथील राजकारण तसेच समाजकारणात सक्रिय होते. १९९७ ला ते प्रथम मुंबई मनपामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००२ व २००९ च्या निवडणूकीतही ते नगरसेवक झाले. २०१४ च्या निवडणूकीत शिवसेनेने त्यांना अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघातुन संधी दिली. यावेळी लटके यांनी भाजपचे उमेदवार सुनिल यादव यांचा पराभव करत आमदारकीच्या पहिल्याच निवडणूकीत यश मिळवले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत मतदार संघांतील जनतेने पुन्हा रमेश लटके यांच्यावर विश्वास दाखविला. या निवडणूकीत अपक्ष उमेदवार एम . पटेल यांचा तब्बल १६ हजार ९६५ मतानी पराभव करून लटके सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. आताच्या पोटनिवडणूकीतील विजयाने श्रीमती ऋतुजा लटके यांच्या रुपाने लटके कुटुंबियाकडे अंधेरी पूर्व मतदार संघाची सलग तिसऱ्यांदा आमदारकीची धुरा आली आहे.

दरम्यान स्व. आ. रमेश लटके यांनी २००० मध्ये माजी आ. श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड व बाबासाहेब पाटील - सरुडकर यांच्या विरोधात सेनेच्या उमेदवारीवर शाहूवाडी विधानसभेची पोटनिवडणूकही लढवली होती परंतू या निवडणूकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते . 

ठाकरे घराण्यांशी एकनिष्ठ

स्व. रमेश लटके यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी सेनेचा भगवा आपल्या हाती घेतला होता. दरम्यान गेल्या २० वर्षात नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरही लटके कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहे.
 

Web Title: Andheri East By Election Result 2022 Rutuja Latke won Shahuwadi's daughter-in-law became Andheri MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.