कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे 

By समीर देशपांडे | Published: November 20, 2023 05:07 PM2023-11-20T17:07:01+5:302023-11-20T17:09:03+5:30

कोल्हापूर : विविध संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ...

Anganwadi employees march at Kolhapur Zilla Parishad for salary, pension and other demands | कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : विविध संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले तर सहा संघटना उपोषण आणि धरणे आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत.

मानधन, पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले. त्यात आयटक संंलग्न संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या संघटनांचा समावेश होता. अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कृती समितीचा मोठा मोर्चा निघाला तर आयटकच्या सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला मर्यादित प्रतिसाद होता. शाहूवाडीच्या तत्कालिन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी एका कार्यकर्त्यांने जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करावी, कोल्हापूर यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड यांची चौकशी करावी, महसूल विभागाने चुकीचे भूखंड वाटप केल्याबद्दल तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाज, यशवंत सेनेच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाचा पाचवा दिवस असून चार कार्यकर्त्यांनी मुंडण करून घेतले.

Web Title: Anganwadi employees march at Kolhapur Zilla Parishad for salary, pension and other demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.