तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत; ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:14 PM2020-04-14T17:14:40+5:302020-04-14T17:15:15+5:30

सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते.

Anganwadi staff waiting for honors | तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत; ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत; ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

Next

तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत;  ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

कोल्हापूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे फेबु्रवारी व मार्च या दोन महिन्यांचे मानधन प्रलंबित राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट सगळीकडे आहे. या संकटातही मोठ्या धैर्याने घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाची जबाबदारी हेच कर्मचारी पार पाडत आहेत.

सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते.

फेबु्रवारी व मार्चचे मानधन अद्याप झालेले नाही. सध्या अंगणवाडी सेविकांना आठ हजार तर मदतनिसांना ४२०० रुपये मानधन दरमहा मिळते. त्यांचे काम पाहिले तर हे मानधन फारच तुटपुंजे आहे. तेही वेळेत मिळत नसल्याने अडचणी निर्माण होतात. सध्या सगळीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत सगळे घरात बसले असताना अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर आहेत. प्रत्येक घरात जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षणाची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर दिली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या घरोघरी फिरत आहेत. त्यासाठी शासनाने त्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा जरी केली असली तरी जोखीम उचलून त्या कोरोनाविरोधातील लढाईत उतरले आहेत. अशा परिस्थिती त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी शासनाची आहे. तसे होताना दिसत नसून फेबु्रवारीपासूनचे मानधनच त्यांना दिलेले नाही.

दहा महिन्यांचा फरक वाटप सुरू
आॅक्टोबर २०१९ पासूनचा अंगणवाडी कर्मचाºयांचा फरक देय होता. त्याचे वाटप सुरू झाले असून बहुतांश तालुक्यातील कर्मचाºयांना हे पैसे मिळालेले आहेत.

 

‘कोरोना’च्या संकटात सेविका व मदतनीस सर्व्हेक्षण व जनजागरणाचे काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचाºयांचे हातावरील पोटे आहेत. लॉकडाऊन आणि त्यात मानधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. शासनाने मानधनाबरोबरच पुढील महिन्याचे आगाऊ पैसे दिले पाहिजेत. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे मागणी केली आहे.
- सुवर्णा तळेकर (नेत्या, अंगणवाडी कर्मचारी संघटना)
----------------------------------------------------
(राजाराम लोंढे)

Web Title: Anganwadi staff waiting for honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.