सोमवारपासून अंगणवाड्या गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 09:18 PM2017-10-06T21:18:21+5:302017-10-06T21:19:56+5:30

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सोमवार (दि. ९) पासून अंगणवाडी कर्मचारी कामावर

Anganwadi will start from Monday | सोमवारपासून अंगणवाड्या गजबजणार

सोमवारपासून अंगणवाड्या गजबजणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतरकोल्हापूर जिल्'ातील कर्मचाºयांनी त्याला भीक घातली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सोमवार (दि. ९) पासून अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याने पुन्हा अंगणवाड्या चिमुकल्यांनी गजबजणार आहेत.मानधनवाढीसह बढती व अन्य अनेक मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या होत्या. यानंतर मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात झाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर केवळ दीड हजार रुपयांची वाढ अमान्य करून संप सुरूच राहिला.

इतर अनेक ठिकाणी यानंतर कर्मचारी हजर व्हायला सुरुवात झाली. मात्र कोल्हापूर जिल्'ात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी हे आंदोलन चांगलेच ताणवून धरले. जेल भरो, रास्ता रोको यांमुळे दबाव आला तरी कोल्हापूर जिल्'ातील कर्मचाºयांनी त्याला भीक घातली नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

आम्ही समाधानी नाही
शुक्रवारी दुपारनंतर मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांनी घेतला होता; परंतु अचानक दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आला. त्यामुळे आम्ही चर्चेत सहभागी होऊ शकलो नाही; पण आता संप मागे घेतल्याची घोषणा झाली आहे. केवळ ४० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे. यातून फार काही साध्य झाले नाही; परंतु सोमवारपासून आमचे कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये हजर होतील, असे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हा सरचिटणीस सुवर्णा तळेकर यांनी सांगितले.

जिल्'ात एकूण अंगणवाड्या - ३९९४
अंगणवाडी सेविका - ३९९४
अंगणवाडी मदतनीस - ३९९४
पर्यवेक्षक - १४९

 

 

Web Title: Anganwadi will start from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.