घरगुती गॅसचा स्फोट होऊन कबनुरमध्ये अंगणवाडी सेविका गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 12:20 PM2021-10-13T12:20:32+5:302021-10-13T12:21:28+5:30
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचे सर्व पत्रे फुटुले आहेत.
इचलकरंजी : कबनूर येथील दत्तनगर गल्ली नंबर ११ मध्ये अंगणवाडी सेविका कांचन संजय स्वामी यांच्या घरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅसचा मोठा स्फोट झाल्याने महिला गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले.
स्वामी या सीद्राम नरसप्पा अथणी यांच्या घरी भाड्याने राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी जाऊन आल्या अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गॅस चालू करत असताना मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचे सर्व पत्रे फुटुले आहेत. फुटलेली पत्रे व छत शेजारच्या घरावर उडून पडले आहेत. प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महिलेला ६० टक्केच्यावर भाजले असल्याने उपचारासाठी सांगली हॉस्पिटलला नेण्यात आले. जखमी कांचन स्वामी या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहतात. सकाळी घरी एकटीच होत्या. त्यांचा मुलगा आजोळी मामाच्या गावी आहे
घरगुती सिलेंडरच्या स्फोटात महिला गंभीर जखमी, घराचं प्रचंड नुकसान, इचलकरंजी येथील घटना #CylinderBlastpic.twitter.com/6id5QbtzhQ
— Lokmat (@MiLOKMAT) October 13, 2021