अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्याचा विचार, सरकारी सेवेस नकार; महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:50 AM2022-09-27T11:50:15+5:302022-09-27T11:51:18+5:30

तूटपूंजा मानधनात कुटुंब चालवणे मुश्कील

Anganwadi worker salary increase consideration, refusal of government service; Explanation of Minister of Women and Child Development | अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्याचा विचार, सरकारी सेवेस नकार; महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण

संग्रहित फोटो

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : मानधन वाढ करण्याबाबत विचार करू... ती किती व केव्हा करणार याबद्दल कोणतेही ठोस आश्वासन देण्यास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी नकार दिला. सरकार तुमच्या प्रश्र्नांबद्दल सकारात्मक आहे एवढेच आश्वासन त्यांनी दिले. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याशी त्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ही केंद्र शासनाची योजना आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी आहात. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकर म्हणता येणार नसल्याचे प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी या चर्चेत स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्ह्यातील दोन सेविका, एक पर्यवेक्षिका यांना या चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११.३० ते १२ या वेळेत ही चर्चा झाली. चर्चेत आयुक्त रुबल आगरवाल व कोल्हापुरातून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुवर्णा तळेकर सहभागी झाल्या होत्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प या

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व सरकारी सेवेचा दर्जा द्या, अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. समितीशी चर्चा करताना सरकार थेट सेविकांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ही चर्चा झाली. लोकशाही असल्याने आम्ही तुमचे म्हणणे ऐकून घेत असल्याचे मंत्री लोढा यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

चर्चेत अंगणवाडी सेविकेला १५ ते १८ हजार, तर मदतनीससाठी ११ हजार मानधन देण्याची मागणी झाली. सध्या सेविकेस ८,५०० तर मदतनीसला ४,२५० मानधन दिले जाते. एवढ्या तूटपूंजा मानधनात कुटुंब चालवणे मुश्कील आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अनेक महिलांना धुणी-भांड्यांची कामे करून संसाराचा गाडा चालवावा लागतो. कामे ढीगभर आणि पगार पळीभर अशी स्थिती असल्याच्या व्यथा महिलांनी मांडल्या. परंतु सरकारने फारसे ठोस आश्वासन दिले नाही.

  • राज्यातील एकूण प्रकल्प - ५५३
  • ग्रामीण भागातील प्रकल्प-३६४
  • नागरी झोपडपट्टीतील प्रकल्प-१०४
  • एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत एकूण अंगणवाड्या सुरु : १ लाख १० हजार ४८५
  • शून्य ते ६ वर्षांपर्यंतची लाभार्थी मुले : ८६ लाख ३१ हजार ९१०.


भाऊबीज २ हजार मिळणार

राज्य सरकारने दिवाळीला २ हजार रुपये भाऊबीज देण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. ही तरी रक्कम किमान वेळेत मिळावी, अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुवर्णा तळेकर यांनी व्यक्त केली.

गोवा, पाँडेचरीत जास्त मानधन

गोवा, पाँडेचरी व तामिळनाडूमध्ये जास्त मानधन दिले जाते. मग महाराष्ट्रात का मिळत नाही, असेही महिलांनी विचारले. परंतु त्याबद्दल फारसे स्पष्टीकरण झाले नाही.

Web Title: Anganwadi worker salary increase consideration, refusal of government service; Explanation of Minister of Women and Child Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.