सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवणारा देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:27+5:302021-04-20T04:24:27+5:30

अत्याधुनिक साधनसामग्रीच्या दुनियेत माणसाला आत्मिक समाधान मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी मानव कुठे ना कुठे लीन होतो. विविध धर्मातील लोक ...

An angel who raises the standard of living of the common people | सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवणारा देवदूत

सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवणारा देवदूत

Next

अत्याधुनिक साधनसामग्रीच्या दुनियेत माणसाला आत्मिक समाधान मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी मानव कुठे ना कुठे लीन होतो. विविध धर्मातील लोक आपापल्या श्रद्धेतूनच गावामध्ये असणाऱ्या देवदेवतांची मंदिरे सुसज्ज करतात. कागल तालुक्यातील सर्वच गावातील शेकडो मंदिरांना, धार्मिक स्थळांना कोट्यवधींचा निधी देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलकरांचे आत्मिक समाधान वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच विकासाचा दूत अशी उपमा देत असताना त्यांना आता कागलकरांची श्रद्धा अढळ करणारा देवदूत अशी ही लोक उपमा देत आहेत. आज राम नवमी, या देवदूताचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त थोडेसे....

कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणून परिचित असणारे, शिवाय कार्यकर्त्यांच्यावर आलेली संकटे लीलया दूर करण्यामध्ये अग्रेसर असणारे राज्याचे नेते मा. हसन मुश्रीफ यांचा जन्मदिन आजचा दिवस सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर संपूर्ण कागलकरांना प्रेरणा मिळणारा दिवस. समाजहिताच्या अलौकिक कार्याने प्रेरित होऊन दानशूरतेची शिदोरी घेऊन दलितांच्या, बहुजन समाजाच्या व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी सत्तेवर तुळशीपत्र ठेवावे लागले तरी चालेल या विचारांचा वारसा घेऊन हसन मुश्रीफ आज... व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कागलच्या मातीने राजर्षी शाहूंच्या रूपाने जगाला मानवतेचा, समतेचा विचार आपल्या कृतीतून आणून दाखविणारा लोकराजा मिळवून दिला. याच शाहूंच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या कृतीवर श्रद्धा ठेवत जिल्हा, राज्य व देश पातळीवर अनेक माणसे घडली. यामध्ये प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

कागलकरांच्या मनाचा ठाव घेऊन कागल शहरामध्ये उभे केलेले भव्य दिव्य राम मंदिर म्हणजे कागलकरांची स्वप्नपूर्तीच. अयोध्येतील राम मंदिर कधी उभे रहायचे त्यावेळी राहील. पण कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने एक आकर्षक राम मंदिर उभा राहिले. आज ते पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय होताना दिसत आहे. याप्रमाणे मुरगूडचे ग्राम दैवत अंबाबाई मंदिर, सर्व गावकऱ्यांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरवात केली. ज्या ज्या वेळी निधीची गरज भासेल त्या त्या वेळी मुश्रीफांनी निधी दिला. आता तर मंदिर अंतिम टप्प्यात आले आहे. अजून निधीची आवश्यकता आहे. ज्या ज्या वेळी गरज भासेल त्या त्या वेळी त्यांनी निधी दिला आहे. याच पद्धतीने गावागावातील मंदिरे श्रध्दास्थळे बनण्यासाठी मुश्रीफांनी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे या सर्वांचे फळ म्हणून यावेळी त्यांना राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी अगदी वजनदार ग्रामविकास खाते मिळाले आहे.

याबरोबरच कागल विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेली चाळीस वर्षे राजकारण, समाजकारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यानेच राज्याच्या मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांची ग्रामविकासमंत्रिपदी वर्णी लागली. ही किमया केवळ कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफनीच करून दाखविली. यापूर्वी सलग सोळा वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, न्याय विधी, विशेष सहाय्य, परिवहन, कामगार, जलसंपदा अशा महत्त्वाच्या डझनभर खात्यांचा कार्यभार सांभाळताना त्या मंत्रिपदातून सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल याचा अभ्यास करून प्रत्येक खात्यातून जनतेला योजनेचा लाभ झाला पाहिजे यासाठी प्रशासनातील अनुभवी व्यक्तीची आज ग्रामविकास मंत्री म्हणून निवड झाल्याने राज्यात ग्रामविकासाची नवी समृध्दी निर्माण होईल अशा भावना जनमानसात निर्माण झाल्या आहेत.

आज राज्याच्या वजनदार मंत्र्यांच्या यादीत हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत. त्यांच्या कामाच्या जोरावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठेच्या आधारावरच हे करून दाखविले आहे. त्यांची मंत्रिमंडळातील कोणतेही खाते मिळो त्या खात्याचा अभ्यास करून प्रशासनावर पकड आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री या खात्याने त्यांच्या कार्याचा सन्मान झाला आहे. त्यामुळे ग्रामविकास खात्याचे समृद्धी कशी येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याशिवाय राहणार नाही. या खात्यातूनदेखील राज्याला विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यात यशस्वी होणार हे नक्की. ग्रामीण भागाबरोबरच कोल्हापूर जिल्हा समृद्ध आणि सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आणि विकासाचे पर्व पुन्हा वेगाने पुढे नेण्यासाठी या खात्याला देखील योग्य रितीने अभ्यास करून ग्राम विकासातून समृद्धी असा नवीन पॅटर्न निर्माण होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे.

मुश्रीफ यांनी अडचणीच्या वेळी ‘पवार एके पवार’ असा कणखर आणि निष्ठावंत बाणा सांगितला होता.

गोरगरिबांचा देवदूत आणि महाडॉक्टर या पदव्या जनतेनेच त्यांना दिल्या आहेत. त्यांच्या या महान कामाची नोंद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेऊन विधान भवनातच त्यांचे तोंडभरून कौतुकही केले होते. विशेष सहाय्य खात्याच्या माध्यमातून अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या, वृध्द अशा निराधारांनी वंचित घटकांना पेन्शन योजना प्रभावीपणाने राबविली. त्यामुळेच या घटकांचे ते जणू श्रावण बाळच आहेत. कामगारमंत्री म्हणून काम करताना बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांचे सुरक्षा आणि जीवनमान उंचावले. आज या मंडळाकडे १२ हजार कोटींच्या ठेवी आहेत. या मंत्रिपदाच्या माध्यमातूनच मोलकरणींचे कल्याणकारी मंडळही स्थापन करुन राज्यभरातील मोलकरणींना न्याय दिला. आता काही दिवसांपूर्वी पुन्हा देशाचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांच्यावरचा विश्वास दृढ केला आहे. अशा सर्वसामान्य माणसांना हिमालयासारखे पाठबळ देणाऱ्या या देवदूतास वाढदिवसास लाख लाख शुभेच्छा!!!!

---

अनिल पाटील, मुरगूड

Web Title: An angel who raises the standard of living of the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.