अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:06 PM2018-07-20T17:06:36+5:302018-07-20T17:09:02+5:30
कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.
कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.
निवड झालेल्या संघात बहुतांशी सतरा वर्षाखालील युवा विश्वचषक खेळलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ या दौऱ्यात २३ ते २५ जुलै दरम्यान स्पेन येथील स्थानिक संघांबरोबर सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर कोटीफ चषक स्पर्धेतील सामने खेळणार आहे.
यात प्रथम अर्जेटिना, व्हेन्झुला, मॉर्टिनीया, मुर्सिया, या चार देशांच्या संघाबरोबर खेळणार आहे. यात कोल्हापूरचा अनिकेत जाधव यांची फॉरवर्ड म्हणून संघात निवड झाली आहे.
अनिकेतला के.एस.ए. पेट्रन इन-चिफ शाहू छत्रपती, विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे, खासदार संभाजीराजे, विफाच्या महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन लाभले.