चौकशीअंती अनिल देशमुख निर्दोष होतील - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:06+5:302021-04-25T04:24:06+5:30
कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांची चौकशी करणे म्हणजे सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे कटकारस्थान ...
कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांची चौकशी करणे म्हणजे सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे कटकारस्थान आहे. कितीही चौकशा केल्या तरी अनिल देशमुख हे निर्दोष आहेत, हे सिद्ध होईल, असा विश्वास ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत निवासस्थानी शनिवारी सीबीआयच्या पथकांनी छापे टाकले. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपण उद्योगपती अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणे, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांचा लेटरबॉम्ब ही सगळी भाजपची खेळी होती. परवीरसिंग व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणे, पहाटे दोन-अडीच वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणे, त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाणे, हा घटनाक्रम काय सांगतोे. एखादा अधिकारी अशा प्रकारचे पत्र देऊ कसा शकतो, पुराव्याशिवाय अशी चौकशी कसे होऊ शकते. वाझेची पाेलीस कस्टडी संपली आता न्यायलयीन कस्टडी आहे, मग स्फोटके कोणी ठेवली त्यामागील मास्टरमाइंड कोण, त्यांची नावे का पुढे येत नाहीत. या सर्व प्रकरणात वाझे व परवीरसिंगांकडे बोटे वळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी व माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजप व परमवीरसिंगांनी केलेले कारस्थान आहे. चौकशी होऊ दे दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाऊ दे, यातून अनिल देशमुख निर्दाेष मुक्त होतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.