बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणिमित्रांमुळे सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:33+5:302021-07-07T04:30:33+5:30

कोल्हापूर : कोरोना काळात उपासमारीमुळे माणसासोबत वन्यजीवांनाही अन्नपाण्यावाचून उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. अशाच एका भुकेलेल्या कुत्र्याने खाण्यासाठी बरणीत ...

Animal friends rescue dog trapped in jar | बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणिमित्रांमुळे सुटका

बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणिमित्रांमुळे सुटका

Next

कोल्हापूर : कोरोना काळात उपासमारीमुळे माणसासोबत वन्यजीवांनाही अन्नपाण्यावाचून उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. अशाच एका भुकेलेल्या कुत्र्याने खाण्यासाठी बरणीत तोंड घातले, पण त्याचे त्यात तोंड अडकले. त्यातून बाहेर पडण्यासाठी दिवसभर त्या कुत्र्याची केविलवाणी तडफड सुरू होती. अखेर कोल्हापुरातील दोन प्राणिमित्रांनी या कुत्र्याची सुटका केली.

काहीतरी खायला मिळेल या आशेने या कुत्र्याने एका प्लॅस्टिकच्या बरणीत तोंड घातले होते, मात्र त्यातच तोंड अडकल्यामुळे तो दिवसभर शहरातील गंगावेश ते लक्ष्मीपुरी परिसरात सैरावरा केकाटत पळत होता. परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी त्याच्या तोंडातून बरणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घाबरून ते पळून जाऊ लागल्याने त्यांनी त्याचा नाद सोडला.

अखेर या कुत्र्याची माहिती प्राणिमित्र अक्षय कांबळे यांना मिळाली. त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण घाबरल्यामुळे ते अंगाला हात लावू देत नव्हते. दोन ते तीन तासांनंतर थकल्यामुळे या कुत्र्याला पापाची तिकटी परिसरात अक्षय कांबळे आणि स्नेहा जाधव यांनी ट्रॅप लावून त्या कुत्र्याला पकडले. त्यांना स्थानिक रहिवाशांनीही मदत केली. पकडल्यानंतरही तो कुत्रा अंगावर धावून येत होता.

अखेर या दोघांनी त्याला घट्ट पकडून त्याच्या तोंडात अडकलेली बरणी कापून काढून टाकली आणि त्याचे तोंड मोकळे केले. तहान-भुकेने व्याकूळ झालेले ते कुत्रे तडफडत होते. बरणी काढल्यानंतरही ते निपचित पडले होते. प्राणिमित्रांनी आणि रहिवाशांनी त्याच्यावर उपचार केले आणि थोडे खायाला दिले. अन्न पोटात गेल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

कोट

नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बरण्या, पिशव्या, डबे कचऱ्यामध्ये उघडून टाकू नयेत. त्यांची मोडतोड करून किंवा झाकण लावून विल्हेवाट लावावी. वन्यजीवांची थोडीशी काळजी घ्यावी.

-अक्षय कांबळे, प्राणीमित्र, कोल्हापूर

------------

(बातमीदार : संदीप आडनाईक)

06072021-kol-save dog

फोटो ओळ : बरणी तोेंडात अडकल्यामुळे तडफडणाऱ्या कुत्र्याला प्राणिमित्र अक्षक कांबळे आणि स्नेहा जाधव यांनी त्याची सुटका केली.

060721\06kol_2_06072021_5.jpg

06072021-kol-save dogफोटो ओळ : बरणी तोेंडात अडकल्यामुळे तडफडणाऱ्या कुत्र्याला प्राणिमित्र अक्षक कांबळे आणि स्नेहा जाधव यांनी त्याची सुटका केली.

Web Title: Animal friends rescue dog trapped in jar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.