जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता

By राजाराम लोंढे | Published: September 5, 2022 02:10 PM2022-09-05T14:10:09+5:302022-09-05T14:11:24+5:30

पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले

Animals infected with Lumpyskin disease, Animals may die if neglected | जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : लम्पीस्कीन या संसर्गजन्य आजारावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आज, सोमवारी दुसऱ्या दिवशी हातकणंगले तालुक्यात लसीकरण करण्या  आले. आतापर्यंत ४ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसात एकाही नवीन जनावराला या आजाराची लागण झालेली नाही.

अतिग्रे पैकी चौगलेवाडी येथील जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली होती. त्याचा प्रसार झपाट्याने सुरु होता. जनावराच्या विशेषता गाय वर्गीय जनावराच्या अंगावर फोडे उठतात. यामुळे जनावरांना ताप येतो, वैरण खात नाही, दूध कमी देते. अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले तर जनावरे दगावण्याची शक्यताही असते.

अतिग्रे, चौगलेवाडीतील २० जनावरांना लागण झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले. हासंसर्गजन्य आजार असल्याने लागण झालेल्या जनावरांना दुसऱ्या जनावरांपासून लांब बांधण्यापासून इतर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातच औषधोपचार सुरु करुन रविवार पासून लसीकरणही सुरु केले. त्यामुळे साथ बऱ्यापैकी अटोक्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसात नवीन एकाही जनावराला ‘लम्पी’ची लागण झालेली नाही. काल, रविवारी ३६०० तर, आज, सोमवारी उर्वरित चारशे जनावरांना लसीकरण करण्यात आले.

Web Title: Animals infected with Lumpyskin disease, Animals may die if neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.