कोल्हापूरच्या अनीश गांधीस विजेतेपद-

By admin | Published: August 13, 2015 11:40 PM2015-08-13T23:40:50+5:302015-08-14T00:01:26+5:30

दिग्विजय खानविलकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

Anish Gandhi's title of Kolhapur title | कोल्हापूरच्या अनीश गांधीस विजेतेपद-

कोल्हापूरच्या अनीश गांधीस विजेतेपद-

Next

कोल्हापूर : जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या करवीर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै. दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या अनीश गांधीने नऊपैकी साडेआठ गुण मिळवून विजेतपद पटकावले; तर आंतरराष्ट्रीय मास्टरमध्ये रेल्वेचा समीर कठमाळे हा आठ गुण मिळवून उपविजेता ठरला.
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला फिडे मास्टर ऋचा पुजारी साडेसात गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. विजेत्या स्पर्धकांना आयकर विभागाचे आयुक्त के. आर. मेघवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे : रणजित मोहिते (पुणे), विक्रमादित्य कुलकर्णी (पश्चिम रेल्वे), संकर्ष शेळके (अहमदनगर), ओंकार कडव (सातारा), अखिलेश नागरे (नाशिक), पृथ्वीराज नार्वेकर (कोल्हापूर), आदित्य गुहागरकर (मुंबई), शुभम लाकूडकर (नागपूर), सौरभ कुलकर्णी (मुंबई), सुनील वैद्य (पुणे), धनश्री राठी (नाशिक), श्रीराज भोसले (रेंदाळ), झाकीर कादरी (मुंबई), अर्जुन अडप्पा (मंगलोर), गौरव दास (पुणे), अबीद अली मुजावर (हुबळी), अभिषेक गिरी (मुंबई), श्रेयस कोठवळे (नाशिक).
बक्षीस वितरण प्रसंगी कर्नल शिवराज पाटील यांच्यासह चिदंबर कोटीभास्कर, राजलक्ष्मी खानविलकर, विश्वविजय खानविलकर, सुमित्राराजे खानविलकर, भरत चौगुले, प्रीतम घोडके, राजू मकोटे, आदी उपस्थित होते.


कोल्हापुरात जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या करवीर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै. दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत आयकर विभागाचे आयुक्त के. आर. मेघवाल, विश्वविजय खानविलकर, कर्नल शिवराज पाटील, चिदंबर कोटीभास्कर, राजलक्ष्मी खानविलकर, सुमित्राराजे खानविलकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Anish Gandhi's title of Kolhapur title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.