अंजली निगवेकर शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग विभागप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 07:08 PM2018-12-29T19:08:46+5:302018-12-29T19:10:32+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषत: गायन अध्यापनात स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरूंनी ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Anjali Nigavekar Shivaji University's first divining division chief | अंजली निगवेकर शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग विभागप्रमुख

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग अधिविभागप्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांचे ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अभिनंदन केले. यावेळी शेजारी डी. टी. शिर्के, विलास नांदवडेकर, डी. आर. मोरे यांच्यासह संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देअंजली निगवेकर शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग विभागप्रमुख‘संगीतशास्त्रा’ची जबाबदारी; कुलगुरूंकडून अभिनंदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषत: गायन अध्यापनात स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरूंनी ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध गायन कलाप्रकारांत निष्णात असलेल्या डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा लाभ संगीतशास्त्र अधिविभागाला निश्चितपणे होईल. विद्यापीठ प्रशासनाचे त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील. आपल्या दिव्यांगत्वाची कोणतीही सबब पुढे न करता गेली सुमारे २८ वर्षे डॉ. निगवेकर विद्यापीठात अध्यापन कार्य करीत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

अधिविभाग प्रमुखपदाची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे सांभाळतील. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, संगीतशास्त्र अधिविभागातील शिक्षक निखिल भगत, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि सुप्रिया टिपुगडे, आदी उपस्थित होते.

२८ वर्षे अध्यापनाचे कार्य

डॉ. निगवेकर या १९८६ मध्ये संगीतशास्त्र अधिविभागात विद्यार्थिनी म्हणून प्रवेशित झालेल्या होत्या. त्यानंतर डॉ. भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतशास्त्र विषयात पीएच.डी. केली असून, १९९१पासून शिवाजी विद्यापीठात गेली २८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थिनी ते अधिविभागप्रमुख असा त्यांचा येथील प्रवास आहे.


मी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती विद्यापीठाने मला या नियुक्तीच्या माध्यमातून दिली आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी आनंददायक आणि प्रोत्साहन देणारी आहे. माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. अधिविभाग आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मी कार्यरत राहीन.
- डॉ. अंजली निगवेकर
 

 

Web Title: Anjali Nigavekar Shivaji University's first divining division chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.