आण्णा महाराज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:30+5:302021-06-26T04:17:30+5:30

म्हासुर्ली दी 25(वार्ताह म्हासुर्ली : अल्लख निरंजन नाथ शक्तीपीठ चॅरिटेबल ट्रस्ट, पणोरे, (ता.पन्हाळा)चे संस्थापक आणि धामणी खोऱ्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ...

Anna Maharaj passed away | आण्णा महाराज यांचे निधन

आण्णा महाराज यांचे निधन

googlenewsNext

म्हासुर्ली दी 25(वार्ताह

म्हासुर्ली : अल्लख निरंजन नाथ शक्तीपीठ चॅरिटेबल ट्रस्ट, पणोरे, (ता.पन्हाळा)चे संस्थापक आणि धामणी खोऱ्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व आध्यात्मिक गुरू परमपूज्य आनंदा राऊ चौगले ऊर्फ आण्णा महाराज (वय ७० वर्षे ) यांचे निधन झाले. पणोरे येथे त्यांनी महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, गहिनीनाथ मंदिर, मारुती मंदिर, भक्त निवास अशा भव्य वास्तूंची उभारणी करून महाशिवरात्र, दत्त जयंती, धर्मनाथ बीज, स्वामी जयंती, गुरू पौर्णिमा असे विविध धार्मिक उत्सव व सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात त्यांचेकडून गेली कित्येक वर्ष साजरे करण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेर सुध्दा पुणे-मुंबईसारख्या शहरात तसेच कर्नाटक व गोवा या राज्यातही त्यांचा शिष्यगण मोठ्या संख्येने आहेत.

राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, व्यसनमुक्ती, भक्तगणांच्या प्रापंचिक अडचणीत त्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करून सर्व सामान्य भक्तांमध्ये त्यांनी ईश्वर भक्तीची आवड निर्माण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवार दि. २६ रोजी पाणोरे येथे आहे.

Web Title: Anna Maharaj passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.