आण्णासाहेब मोहोळकर, विनायक पारळे, एन. एल. तरवाळ ठरले जागतिक शास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:56+5:302021-05-27T04:26:56+5:30
या क्रमवारीत स्थान मिळविणारे प्रा. आण्णासाहेब मोहोळकर हे शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. त्यांनी गेल्यावर्षी अमेरिकेच्या ...
या क्रमवारीत स्थान मिळविणारे प्रा. आण्णासाहेब मोहोळकर हे शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. त्यांनी गेल्यावर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. मोहोळकर यांना जागतिक क्रमवारीत टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. त्यांना २९ वर्षे संशोधनातील अनुभव आहे. सौरऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटरबाबतचे त्यांनी पेटंट मिळविले आहेत. मडिलगे (ता.भुदरगड) येथील डॉ. विनायक पारळे हे सध्या दक्षिण कोरियाच्या योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. ते सध्या ऐरोजेल या आव्हानात्मक पदार्थावर पुढील संशोधन करत आहेत. त्यांचे मार्गदर्शक डॉ.एच.एच पार्क आणि टीमला पुढील संशोधनासाठी कोरियन गव्हर्नमेंटकडून शंभर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दुंडगे (ता. चंदगड) येथील डॉ. एन. एल. तरवाळ हे शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते गेल्या १५ वर्षांपासून मटेरियल सायन्समधील सोलार सेल, गॅस सेन्सर, सुपरकॅपॅसिटर, एलेक्ट्रोक्रोमिझम, सुपरहायड्रोफोबिसिटी, मेमरीस्टर या संशोधन क्षेत्रात संशोधन करत आहेत. त्यांनी दक्षिण कोरिया येथील रिसर्च इन्स्टिट्यूट फ़ॉर सोलर अँड सस्टेनेबल एनर्जीज, ग्वाँजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथून प्रा. जे. एच. जँग यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केले. तेथेच त्यांनी कमी खर्चिक अशा सीआयजीएस आणि सीझेडटीएस सौरघरांची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये यश मिळविले. हे तिन्ही शास्त्रज्ञ गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात देतात.
चौकट
क्रमवारी ठरविताना हे निकष
शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स, संशोधन संबंधित रिव्युव्हर, एडिटर म्हणून केलेल्या कामगिरी, आदी निकषांच्या साहाय्याने ही क्रमवारी ठरविली जाते.
फोटो (२६०५२०२१-कोल-आण्णासाहेब मोहोळकर (विद्यापीठ), विनायक पारळे (रिसर्च), एन.एल. तरवाळ (रिसर्च)
===Photopath===
260521\26kol_5_26052021_5.jpg~260521\26kol_6_26052021_5.jpg
===Caption===
फोटो (२६०५२०२१-कोल-आण्णासाहेब मोहोळकर (विद्यापीठ), विनायक पारळे (रिसर्च), एन एल तरवाळ (रिसर्च)~फोटो (२६०५२०२१-कोल-आण्णासाहेब मोहोळकर (विद्यापीठ), विनायक पारळे (रिसर्च), एन एल तरवाळ (रिसर्च)