३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज!, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:54 AM2022-01-24T11:54:06+5:302022-01-24T11:54:52+5:30

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध व्यवसाय, व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम होत आहे.

Annasaheb Patil Economic Backward Development Corporation through Kolhapur district 3946 young men and women to start a business loan of about 313 crore | ३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज!, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी

३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज!, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी

Next

संतोष मिठारी

कोल्हापूर : राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून शासनाने व्याज परतावा योजना अमलात आणली आहे. याअंतर्गत गेल्या चार वर्षांत या महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील ३९४६ युवक- युवतींना व्यवसाय उभारणीसाठी सुमारे ३१३ कोटींचे कर्ज मिळाले आहे. 

कसा कराल अर्ज

या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी मराठा अथवा खुल्या प्रवर्गातील युवकांनी (www.udyog.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ऑनलाइन अर्ज करावा.

काय कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला अथवा कर भरलेले विवरणपत्र अशी, तर कर्ज मंजुरीनंतर बँकेचे कर्जमंजुरी पत्र, कर्ज खाते उतारा, ईएमआय चार्ट, प्रकल्प अहवाल, उद्योग आधार, बचत खात्याचा धनादेश, व्यवसायाचे छायाचित्र.

वीस कोटींचा व्याज परतावा

कर्ज मिळाल्यानंतर संबंधितांनी दर महिन्याला कर्जाचा हप्ता आणि व्याज भरायचे. त्यांनी याबाबतचे ऑनलाइन स्टेटमेंट महामंडळाला सादर केल्यानंतर त्यांच्या बचत खात्यात व्याज परतावा जमा केला जातो. या महामंडळाने कोल्हापूर जिल्ह्यात २० कोटी १६ लाख ८० हजार ३९२ रुपये इतका व्याज परतावा दिला आहे.

९४९३ अर्ज, ३९४६ युवकांना कर्ज

कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे काम सुरू झाले. या महामंडळाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील १०३१२ जणांनी अर्ज केले. त्यातील ३९४६ जणांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना ३१३ कोटी ५८ लाख ०६ हजार ४१८ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ६३६६ जणांना पात्रता प्रमाणपत्र मंजूर झाली आहेत. बँकेच्या पातळीवरील कागदपत्रांच्या पूर्ततेची प्रक्रिया सुरू आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ गेल्या चार वर्षांपासून कार्यान्वित आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्ज प्रकरणे मंजुरी आणि व्याज परतावा यामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. विविध व्यवसाय, व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम महामंडळामार्फत होत आहे. यंदाही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जिल्हा अव्वलस्थानी ठेवण्याचा प्रयत्न राहील. -पुष्पक पालव, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

Web Title: Annasaheb Patil Economic Backward Development Corporation through Kolhapur district 3946 young men and women to start a business loan of about 313 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.