आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:03 PM2020-11-10T12:03:02+5:302020-11-10T12:04:09+5:30
annasahebpatilarthikmagasvikasmahamandal, kolhapurnews आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे.
कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य, विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या महायुतीच्या सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. महामंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यात नवीन सरकारने त्यांना एक वर्ष आणखी काम करण्याची संधी दिली. त्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.
राज्यात १८ हजार तरुणांना रोजगार
महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील व संजय पवार यांच्यावर सोपविल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राज्यात १८ हजार तरुणांना रोजगारासाठी १ लाख कोटीचे विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दीड हजार तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी ११७ कोटींचे वाटप केले.
नियुक्त्या रद्दबाबत अद्याप महामंडळास कोणतेच पत्र आलेले नाही. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या विश्वासाने महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्यास पात्र राहून काम केले. भविष्यात पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेन.
- संजय पवार,
उपाध्यक्ष, आण्णासाहेब पाटील महामंडळ