‘डीआयडी अकादमी’च्या वर्धापनदिनी स्नेहसंमेलन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:59+5:302021-02-11T04:24:59+5:30
कोल्हापूर : येथील डीआयडी ॲकॅडमीचा पाचवा वर्धापन दिन शनिवारी स्नेहसंमेलन आणि विशेष कलाकारांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने रंगला. त्यात ...
कोल्हापूर : येथील डीआयडी ॲकॅडमीचा पाचवा वर्धापन दिन शनिवारी स्नेहसंमेलन आणि विशेष कलाकारांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने रंगला. त्यात विविध नृत्यप्रकार, गायन सादर करण्यात आले.
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवनातील या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत जाधव, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. इरफाना पाटील, आरएसपी ऑफिसर डॉ. विशाल कांबळे, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड, सोलापूर आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डीआयडी ॲकॅडमीचे संस्थापक मॅडी तामगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. डीआयडी वुमन्स क्लबच्या शहर अध्यक्षा अश्विनी ढेगे, उपाध्यक्षा मृणालिनी चव्हाण, खजानिस सारिका भोसले यांच्यासह डीआयडी परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.
चौकट
विविध कलाकार स्पर्धक
या कार्यक्रमात विविध कलाकार, स्पर्धकांनी सादरीकरण केले. त्यात सलीम शेख (लावणी नृत्य), रियाज (फ्री स्टाईल डान्स), केदार देसाई (मेरा ही जलवा), दिव्यांग उज्ज्वला चव्हाण (याद पिया की आन लगी), सिध्दराज पाटील (गायन) यांचा समावेश होता. डीआयडी ॲकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार, कलांचे सादरीकरण केले.