कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन,शिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:44 PM2020-03-11T15:44:51+5:302020-03-11T15:45:51+5:30

शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला.

Anniversary of the invasion of Kailasgarh temple | कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन,शिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी पालखी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. (छाया : अमर कांबळे)

Next
ठळक मुद्देकैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिनशिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

कोल्हापूर : शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला.

मंगळवारपेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी मुख्य पालखी सोहळा होता. सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव, अध्यक्ष बबेराव जाधव, सुनीलकुमार सरनाईक, अशोक मेस्त्री, विलास गौड, शिवाजी जाधव, गणेश भोसले, महेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी पहाटे श्रींस अभिषेक व आरती करण्यात आली.

त्रिशूळाच्या आकारातील चांदीच्या पालखीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरापासून पालखी सोहळ््याला सुरुवात झाली. पालखीच्या सुरुवातीला राशिवडे येथील धनगरी ढोल पथकाचे तालबद्ध वादन आणि नृत्याने सायंकाळच्या या सोहळ््यात उत्साहाचे रंग भरले. झांज पथकाचा नाद पुढे वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्यावतीने मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी भागातील लहान मुले व पुरुष पांढरा झब्बा व भगव्या रंगाचा फेटा परिधान केला होता. तर सजलेल्या महिलांनीही पालखी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला. मार्गात नागरिकांकडून पालखीचे पूजन व स्वागत केले जात होते. पाटाकडील तालीम मंडळ, देवणे गल्ली, खासबाग चौक, भोसले गल्ली मार्गे रात्री पालखी पुन्हा मंदिरात आली. वर्धापनदिनानिमित्त मंदिराला व संपूर्ण परिसरालाच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री महाप्रसादाने या आठ दिवसीय सोहळ््याची सांगता झाली.

 

 

Web Title: Anniversary of the invasion of Kailasgarh temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.