करवीर पीठाचे पुरस्कार जाहीर : शिवस्वरूप भेंडे, १७ तारखेला वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:22 AM2019-05-10T11:22:38+5:302019-05-10T11:24:14+5:30
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी या नावांची घोषणा केली.
कोल्हापूर : श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी या नावांची घोषणा केली.
करवीरपीठात १४ ते १८ तारखेदरम्यान आद्य शंकराचार्य जयंती उत्सव होत आहे. याअंंतर्गत शुक्रवारी (दि. १७) सकाळी १0 वाजता प. पू. विद्यानृसिंह भारती स्वामीजी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा उपस्थित असतील. शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याशिवाय पीठाच्या ज्ञान मासिकासाठी सहकार्य केलेले वि. गो. देसाई, यज्ञेश्वर शास्त्री, महेंद्र इनामदार, आनंद नाईक, प्रमोद शास्त्री, डॉ. शुभदा दिवाण, शिलदत्त सुळे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १८) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळा व महाप्रसाद होणार आहे. तरी कोल्हापूरकरांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.