विद्यापीठातील प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: April 2, 2017 12:56 AM2017-04-02T00:56:22+5:302017-04-02T00:56:22+5:30
आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतीने परीक्षा, सुमारे १५० अभ्यासक्रमांसाठी परीक्षा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ५ मेपासून सुरू होणार असून, आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतींनी ही परीक्षा होईल. यासाठी शनिवारपासून परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती ँ३३स्र२.\ङ्मल्ल’्रल्ली२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल,६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या (२०१७-१८) विविध सुमारे १५० अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. आॅफलाईन परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठ, सायबर (कोल्हापूर), यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (सातारा), संत गाडगेबाबा महाविद्यालय (कऱ्हाड), कस्तुरबाई वालचंद कॉलेज आॅफ आर्टस अँड सायन्स (सांगली), तर आॅनलाईन परीक्षांसाठी कोल्हापुरातील डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, केआयटी, डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूरमधील जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग, सातारामधील के. बी. पी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कँप, यशोदा टेक्निकल कॅम्पस, अरविंद गवळी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, तर सांगली जिल्ह्यातील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (साखराळे), अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (आष्टा), अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स (सांगली-मिरज हायवे) ही केंद्रे आहेत.
अशी होणार परीक्षा...
आॅफलाईन
दि. ५ मे : एम.ए. / एम. एस्सी. भूगोल, मास कम्युनिकेशन, एम.एस्सी. केमिस्ट्री, बी. जे. सी, एम. जे. सी, एम. एस्सी. अॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. प्रवेश परीक्षा अन्य शाखांसाठी.
दि. ६ मे : बी. लिब. सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अँड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फर्मेटिक्स.
दि. ७ मे : एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, एम. एस. डब्ल्यू. (रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), एम. एस्सी. अल्कोहोल टेक्नॉलॉजी, एम. आर. एस. (मास्टर आॅफ रुरल स्टडीज), एम. बी. ए. (रुरल मॅनेजमेंट), एम. टेक. (रुरल टेक्नॉलॉजी).
आॅनलाईन
दि. ८ मे : एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्सेस, एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स.
दि. ९ मे : एम. एस्सी. प्राणिशास्त्र, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी/बायोकेमिस्ट्री/एन्व्हार्न्मेंटल बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. एन्व्हार्न्मेंटल सायन्स, एम. एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी.