कोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:53 PM2018-12-19T16:53:01+5:302018-12-19T16:55:57+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

Announcing drought in 201 villages of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीरजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दुष्काळग्रस्त गावांना सवलती लागू

कोल्हापूर : जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५0 मि.मी.पेक्षा कमी झाले आहे, अशा कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १९ महसुली मंडळांमधील २0१ गावांमध्ये दुष्काळ घोषित करून, सवलती लागू करण्यास शासनमान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या २०१ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील गावे

दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये हातकणंगले तालुक्यातील ६२ गावे, शिरोळ तालुक्यातील १६, पन्हाळा तालुक्यातील ३५, करवीर तालुक्यातील ३४, गडहिंग्लज तालुक्यातील ३५ आणि भुदरगड तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे.
 

 

Web Title: Announcing drought in 201 villages of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.