सत्तावीसजणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:37+5:302021-09-04T04:30:37+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने १२ तालुक्यातील १२ शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार, एक विशेष शिक्षक आणि पाच डॉ. जे. पी. नाईक ...
जिल्हा परिषदेच्यावतीने १२ तालुक्यातील १२ शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार, एक विशेष शिक्षक आणि पाच डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार असे १८ पुरस्कार देण्यात येतात. यासाठी तालुका पातळीवरून तीन तीन प्रस्ताव मागवण्यात येतात. सकाळी १० पासूनच जिल्हा परिषदेमध्ये मुलाखतीसाठी गुरूजनांची गर्दी झाली होती. राजर्षी शाहू सभागृहामध्ये या मुलाखती घेण्यात आल्या.
अध्यक्ष राहुल पाटील, सभापती रसिका पाटील, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. रात्री आठ वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर चव्हाण यांनी सर्व गुणांचा साकल्याने विचार करून रात्री ९ वाजता पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली.
चौकट
शिफारशींचा पाऊस
पुरस्कार देण्यासाठी मंत्र्यांपासून, खासदार, आमदार आणि मान्यवरांच्या शिफारशींचा अक्षरश पाऊस पडला होता. यातून विधानसभा मतदारसंघ, कारभाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मतदारसंघ, जवळचे शिक्षक अशा सर्व निकषांचा आणि त्यांच्या मूळ कामाचा विचार करून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यासाठी तालुका पातळीवरूनच मोठी फिल्डिंग लावण्यात आली होती. तेथेच गुण दिले जात असल्याने जिल्हा पातळीवर निवड करणाऱ्यांच्या हातात फारसे काही राहात नसल्याने ही पध्दत बदलण्याचीही आता मागणी हाेऊ लागली आहे. याचे सुतोवाचही संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.