Kolhapur- ‘गोकुळ’ची उद्या सभा; विरोधकांची रणनीती पाहता सभा वादळी होणार, अध्यक्ष म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:12 PM2023-09-14T12:12:19+5:302023-09-14T12:14:04+5:30

आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत वाढ झाली असून सेवकांवरील खर्च आठ कोटींने कमी झाला

Annual general meeting of Gokul Milk Sangh tomorrow, | Kolhapur- ‘गोकुळ’ची उद्या सभा; विरोधकांची रणनीती पाहता सभा वादळी होणार, अध्यक्ष म्हणाले..

Kolhapur- ‘गोकुळ’ची उद्या सभा; विरोधकांची रणनीती पाहता सभा वादळी होणार, अध्यक्ष म्हणाले..

googlenewsNext

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांची चर्चा व्हावी. सभेतील प्रत्येक संस्थाचालकाचे समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सभा चालविली जाईल, सभेत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील, असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, संस्थाचालकांची अडचण होऊ नये, प्रत्येकाला सभेला व्यवस्थित बसता यावे, सगळ्यांना प्रश्न विचारता यावे, यासाठी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सभेचे आयोजन केले आहे. सभेला आलेल्या प्रत्येक संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, त्या निदर्शनास आल्यानंतर सुधारणा करुन पुढे जाण्याचे काम करणे अपेक्षित असते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये येथील दूध व्यवसायाचे खूप मोठे योगदान आहे. आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत वाढ झाली असून सेवकांवरील खर्च आठ कोटींने कमी झाला आहे.

दूध उत्पादन वाढ योजनांची घोषणा सभेत

संचालक मंडळाने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी दूध उत्पादनवाढ योजना सुरू करणार आहोत. त्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

‘गोकुळ’ची उद्या सभा

‘गोकुळ’ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी दुपारी एक वाजता महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे होत आहे. सत्तारूढ गटाने तालुकानिहाय संपर्क सभा घेतल्या असून विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांनीही सभा घेऊन कारभार संस्था प्रतिनिधींसमोर मांडला आहे. विरोधकांची एकूणच रणनीती पाहता सभा वादळी होणार हे निश्चित आहे.

Web Title: Annual general meeting of Gokul Milk Sangh tomorrow,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.