श्री बालाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:39+5:302021-09-27T04:25:39+5:30
इचलकरंजी : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन खेळीमेळीत झाली. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
इचलकरंजी : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन खेळीमेळीत झाली. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आभासी पद्धतीने ही सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे होते.
५०० सभासद, ३ कर्मचारी व एक लाख वसूल भागभांडवल स्थापन झालेल्या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे नमूद करून कारंडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेस अहवाल सालात एक कोटी ८३ लाखांचा नफा झाला असून, संस्थेच्या ठेवी ८६ कोटी ५६ लाखांवर पोहोचल्या आहेत. संस्थेने श्री काळभैरव नागरी पतसंस्था विलीन करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नोटीस वाचन दिनेश रेंदाळकर यांनी केले. संजय घायतिडक यांनी स्वागत केले. सभेसाठी भगवान कांबुरे, शिरीष कांबळे, गजानन कडोलकर, संजय झुंजकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत गिड्डे यांनी केले. विजय बाबर यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०२
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मदन कारंडे यांनी मार्गदर्शन केले.