नरेंद्र पटेलच्या आणखी एका साथीदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:49+5:302021-08-14T04:28:49+5:30
ऑनलाईनवर गाडी विकण्याची जाहिरात पाहून संबंधित मालकाला गाठायचे. त्याला वाहनाच्या किमतीचा खोटा धनादेश द्यायचा व त्याचा विश्वास संपादन करायचा ...
ऑनलाईनवर गाडी विकण्याची जाहिरात पाहून संबंधित मालकाला गाठायचे. त्याला वाहनाच्या किमतीचा खोटा धनादेश द्यायचा व त्याचा विश्वास संपादन करायचा आणि वाहन फिरवून बघतो असे सांगून तेथून वाहन घेऊन पसार व्हायचे. पुन्हा वाहन त्या मूळ मालकाला परत द्यायचे नाही, अशा पद्धतीने संशयित नरेंद्र पटेल याने अनेक वाहनमालकांना गंडा घातला होता. त्यापैकी एका प्रकरणात बुलेट चोरी केल्याची फिर्याद सुशांत ढणाल यांनी, तर तेजस बुडके यांनी मोटारकार चोरीची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून संबंधित वाहने हस्तगत करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला. गुरुवारी यातील मोटारसायकल, मोपेड, मोटारकार, एक एक्स युव्ही चारचाकी व तीन दुचाकी अशी सहा वाहने एकूण किंमत २२ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित नरेंद्रला मदत करणारा दुसरा साथीदार पिंटू राजपूत ऊर्फ जितेंद्र यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आणखी सहा गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
फोटो : १३०८२०२१-कोल-नरेंद्र पटेल (संशयित)
फोटो : १३०८२०२१-कोल-कार
आेळी : संशयित नरेंद्र पटेल याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेली कार.