सुनावणीसाठी आणखीन तारीख

By admin | Published: September 8, 2015 12:50 AM2015-09-08T00:50:02+5:302015-09-08T00:50:02+5:30

किमान वेतन प्रश्न : सुनावणी लांबत चालल्याने इचलकरंजीत अस्वस्थता

Another date for the hearing | सुनावणीसाठी आणखीन तारीख

सुनावणीसाठी आणखीन तारीख

Next

इचलकरंजी : यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनाबाबतच्या उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आणखीन पुढील तारीख पडल्याने येथील वस्त्रोद्योगात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेले ४८ दिवस चालू असलेल्या सायझिंग कामगारांचा संप संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता वस्त्रनगरीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून संप सुरू केला आहे. संपामुळे सायझिंग कारखान्यांपाठोपाठ बहुतांशी यंत्रमाग कारखानेही बंद पडले आहेत. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्स कारखान्यांनाही आता कापडाची कमतरता भासू लागली आहे. दररोज होणारी शंभर कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी इचलकरंजीत कमालीची आर्थिक टंचाई भासू लागली आहे.
दीड महिना झाला तरी काही कामगारांना वेतन नाही, तर कापडाच्या उत्पादनात घट झाल्याने काहींना तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यामुळे आठवडी बाजार ओस पडले आहेत. संपाचा परिणामा आता उपाहारगृहे, खानावळी, चित्रपटगृहांवरही दिसू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व सायझिंग असोसिएशनने यापूर्वी किमान वेतनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किमान वेतनाच्या अंमलबजावणीला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली तरी संप संपुष्टात येईल, अशी आशा सायझिंग, यंत्रमाग, प्रोसेसर्स उद्योगातील कारखानदारांबरोबर कामगारांनाही वाटते आहे, ज्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात येथील वस्त्रोद्योग पूर्वीप्रमाणेच सुरू होईल आणि जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, उच्च न्यायालयात किमान वेतनाविषयी म्हणणे मांडण्यास शासन दरवेळी तारीख मागून घेत असल्याने न्यायालयातील सुनावणी तीनवेळा पुढे ढकलली. सोमवारीही उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्यास सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरलना मुदत द्यावी, असे सांगण्यात आले आणि उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवली. न्यायालयामध्ये लांबत चाललेली प्रक्रिया पाहता वस्त्रनगरीत मात्र कमालीची अस्वस्थता आहे. गणेश चतुर्थी, बकरी ईद आणि त्यापाठोपाठ येणारा नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी असे सण पाहता उद्योजकांबरोबरच आता कामगार वर्गामध्येसुद्धा चिंतेचे वातावरण आहे.

कामगार संघटनांचा शनिवारी तिरडी मोर्चा
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १२) शंखध्वनी करीत तिरडी मोर्चा काढण्याची घोषणा यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने केली. थोरात चौकात सोमवारी सायंकाळी झालेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी परशराम आगम होते. किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची पुढील दिशा सांगण्यासाठी ही सभा बोलविली होती. शनिवारी (दि. ५) राजीव गांधी सांस्कृतिक भवनातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला तोडगा सायझिंगधारक मान्य करीत नसल्याबद्दल सभेत जोरदार टीका करण्यात आली. सभेमध्ये कृती समितीचे अध्यक्ष दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, हणमंत लोहार, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, शिवानंद पाटील, राजेंद्र निकम व धोंडिराम कुंभार यांची भाषणे झाली. सभेत दत्ता माने यांनी, सायझिंग कामगारांच्या संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांमधील कामगारांनी दररोज ४०७ रुपयेप्रमाणे खोटीचा पगार मागावा व किमान वेतनाच्या फरकाचे क्लेम दाखल करावेत, असे आवाहन केले.

Web Title: Another date for the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.