corona virus : कोरोनामुळे इचलकरंजी येथील आणखी दोन वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:34 PM2020-07-07T17:34:49+5:302020-07-07T18:46:45+5:30
कोरोनामुळे इचलकरंजी येथील आणखी दोन वृध्दाचा आज दुपारी मृत्यू झाला. ७५ वर्षाच्या या वृध्देसह ७३ वर्षाच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वृध्देचा मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूर : सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात काेरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी सकाळपर्यंत १८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता ९८४ वर जाऊन पोहोचली. त्यांपैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोल्हापूर जिल्हा सुरुवातीच्या काळात सुरक्षित होता; परंतु पुणे, मुंबई तसेच रेड झोनमधील अन्य शहरांतून मूळचे कोल्हापूरवासीय येथे येऊ लागले तशी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. जरी संख्या वाढत जात असली तर संबंधित रुग्ण आधीच क्वारंटाईन होत असल्यामुळे त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आजअखेर १३ बळी घेतले. मंगळवारी ही संख्या आणखी दोनने वाढली. इचलकरंजी येथील एका ७३ वर्षांच्या वृद्धावर कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. निदान होण्यापूर्वीच सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले होते. मंगळवारी त्यांचा स्राव तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे जाहीर करण्यात आले; तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७५ वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला.
सुरक्षीत असल्याचा सतत दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून मंगळवारी सकाळपर्यंत १८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता ९८४ वर जाऊन पोहचली. त्यापैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोल्हापूर जिल्हा सुरवातीच्या काळात सुरक्षित होता. परंतु पुणे, मुंबई तसेच रेडझोनमधील अन्य शहरातून जसे मुळचे कोल्हापूरवासिय यायला लागले तशी कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. जरी संख्या वाढत जात असली तर संबंधित रुग्ण आधीच कॉरंटाईन झाले असल्यामुळे त्यांच्यापासून अन्य व्यक्तीना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत ७४७ प्राप्त अहवालापैकी ७४० निगेटिव्ह तर १८ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (एकाचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आला आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण ९८४ पॉझीटिव्हपैकी ७६१ जणांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आजअखेर जिल्ह्यात एकूण २२३ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
मंगळवारी सकाळपर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामध्ये आजरा तालुक्यातील पाच , चंदगड तालुक्यातील सहा, हातकणंगले व गडहिंग्लज प्रत्येकी दोन, भुदरगड व शिरोळ प्रत्येकी एक या रुग्णांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा- ९२, भुदरगड- ७७, चंदगड- ११४, गडहिंग्लज- ११२, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३०, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- १२, नगरपरिषद क्षेत्र- ९५, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-५९, जिल्हा व राज्यातील २० ( पुणे -२, सोलापूर-३, मुंबई-४, नाशिक -१, कर्नाटक-७, आंध्रप्रदेश-१ आणि सातारा-२ असे इतर असे मिळून एकूण ९८४ रुग्ण.