corona in kolhapur -कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:09 AM2020-04-09T11:09:48+5:302020-04-09T18:49:45+5:30
शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.
कोरोना झालेल्या शाहुवाडी तालुक्यातील हा तरुण दिल्लीमधील तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे एकुण चार रुग्ण आहेत. त्यापैकी पेठवडगाव येथील युवती मिरज येथे उपचार घेत आहे तर भक्तीपूजानगर येथील बहिणभावांवर सीपीआरच्या कोरोना केंद्रात उपचार सुरु आहेत. कसबा बावडा येथील चौथ्या रुग्णावरही सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.
दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
हा तरुण दिल्ली येथून १४ मार्च रोजी निघून १६ ला कोल्हापुरात पोहोचला. येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि १८ मार्चला घरी परतला.
शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेला रुग्ण फक्त एक दिवस नमाज पडण्यासाठी म्हणून दिल्लीला गेला होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे.तो महावितरणमध्ये नोकरीस आहे. दिल्लीहून आल्यानंतर त्याचा मुक्काम कोल्हापूरातील बागल चौकातील मशिदीमध्ये होता. तेथून त्यांना खासगी गाडीने मलकापूरला नेण्यात आले. त्यानंतर तो मलकापूरच्या मशिदीमध्ये दोन दिवस मुक्कामास होता..तिथे अनेकांना भेटला..सासुरवाडी परळे निनाईला गेला होता..तिथे तो गल्लीतील सर्वांना भेटला असल्याची माहिती पुढे आली आहे.
पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १ एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्याला आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.
पन्हाळा शहरासह नरके पब्लिक स्कुलपासुन पाच कि.मी.परीसर सील
शाहुवाडी तालुक्यातील उचतमधील हा तरुण १ एप्रिलपासुन पन्हाळा येथील नरके पब्लिक स्कुल मध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात होता. तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शाहुवाडी तालुक्यातील २७ जण विलगीकरण कक्षात आहेत. त्या सर्वांची तपासणी होणार असुन पन्हाळा शहरासह नरके पब्लिक स्कुलपासुन पाच कि.मी.परीसर आज सील केला आहे
दरम्यान, पेठवडगाव येथील कोरोनाग्रस्त युवतीचा दुसरा तर भक्तीपुजानगर येथील व्यक्तीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा येथील १२ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कोल्हापूरकराना दिलासा मिळाला आहे.