चंदगड तालुक्यात होणार दुसरे पोलीस स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:59+5:302021-07-10T04:16:59+5:30
गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पाण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक ...
गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पाण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, चंदगड हा भाग डोंगराळ असून पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठीचा वेळ वाचविण्यासाठी, तसेच या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दुसरे पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दुसरे पोलीस स्टेशन आवश्यक मनुष्यबळासह सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यासाठी विशेष बाबमधून मंजुरी घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री (शहरे) यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दुसरे पोलीस स्टेशन नेमके कोणत्या ठिकाणी घ्यायचा याबाबतचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.