महावितरणसमोर अजून २०७ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:49+5:302021-03-25T04:23:49+5:30

कोल्हापूर: मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या महावितरणने जनआंदोलनाचा दबाव असतानाही आतापर्यंत थकीत ३८७ कोटींपैकी १८० काेटींची ...

Another target of Rs 207 crore is before MSEDCL | महावितरणसमोर अजून २०७ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य

महावितरणसमोर अजून २०७ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य

Next

कोल्हापूर: मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या महावितरणने जनआंदोलनाचा दबाव असतानाही आतापर्यंत थकीत ३८७ कोटींपैकी १८० काेटींची रक्कम ग्राहकांकडून वसूल केली आहे. अजून २०७ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य समोर ठेवून थकीत वीज बिलांच्या वसुलीचा व कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत दहा हजारावर वीज कनेक्शन खंडितही झाले आहेत.

लॉकडाऊन काळात एप्रिलपासू्न एक रुपयाचीही बिले न भरणाऱ्यांना महावितरणने रडारवर घेत बिले भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडू, या इशारावजा कृतीला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका बाजूला लॉकडाऊन काळातील बिले माफ करावीत म्हणून आंदोलन सुरू असताना महावितरणने मात्र हळूहळू वसुलीचा वेग वाढवत नेला. ऐन उन्हाळ्यात वीज कनेक्शन कापलेले परवडणारे नसल्याने ग्राहकांनीही मुकाट बिले भरण्यास सुरुवात केली आहे. शिवाय खंडित केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपये खर्च करावा लागत असल्याने शासनाचा निर्णय केव्हा होईल तोवर होईल, तोवर थोडी का असेना बिले भरायची, अशी मानसिकता ग्राहकांमध्ये दिसत आहे. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढत चालली असून, आता केवळ साडेचार लाख ग्राहक थकबाकीदारांच्या यादीत राहिले आहेत.

चौकट ०१

महावितरणला दिलासा

महावितरणकडे थकबाकीचा डाेंगर वाढल्याने वीज तयार करण्यासाठी लागणारा कोेळसा खरेदी करण्याची ऐपत महाजनकोकडे राहिली नव्हती. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत थकीत बिले भरा आणि महावितरणला वाचवा, असे आवाहन करण्याची वेळ आली. लोकांनीही याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीत थकीत बिलांच्या ३८७ कोटींपैकी १८० कोटींची बिले भरली गेली आहेत.

चौकट ०२खंडित कनेक्शनची माहिती बंद

वीज कनेक्शन किती कट केले, याचा दैनंदिन आढावा घेतला जात होता आणि तो प्रसिद्धही केला जात होता; पण यावरून समाजात असंतोष वाढीस लागल्यानंतर आणि मोठे आंदोलन झाल्यापासून महावितरणने ही माहिती संकलीत करणे बंद केले आहे. फक्त वसुलीच्या आकड्यावर भर दिला जात आहे.

चौकट ०३

ग्राहक प्रकार थकीत रक्कम वसूल झालेली रक्कम

घरगुती २०३ कोटी ६९ कोटी

वाणिज्य ५३ कोटी ८८ लाख ३२ कोटी

औद्योगिक १३० कोटी ७८ काेटी

Web Title: Another target of Rs 207 crore is before MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.